जोरदार बरसणाऱ्या मुसळधार पावसात नालेसफाईचे दावे फोल, ‘हातसफाई’चा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:06 AM2020-07-07T03:06:20+5:302020-07-07T03:08:11+5:30
पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याप्रकरणी श्वेतप्ाित्रका काढण्याची मागणी भाजपने केली आहे.
मुंबई : विकेंडच्या मुहूर्तावर मुंबईत जोरदार बरसणाºया पावसाने पालिकेचा ११३ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरवला. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याप्रकरणी श्वेतप्ाित्रका काढण्याची मागणी भाजपने केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून मुंबईत सुरू झाला. त्यामुळे पावसाळीपूर्व कामं लांबणीवर पडली, दरवर्षी नालेसफाईचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. परंतु यंदा कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात पालिकेची यंत्रणा व्यस्त होती. परिणामी, नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम मे महिन्यात सुरू झाले.जून महिना कोरडा गेल्याने नाल्यांचे काम पूर्ण करून घेण्याचा अवधी पालिकेला मिळाला. मात्र शुक्र वारपासून झोडपणाºया पावसाने मुंबईची तुंबापुरी केली.
परळ, चेंबूर, खार, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड आणि दहिसर या ठिकाणी काही तासांतच पाणी तुंबले होते. तसेच काही ठिकाणी पाणी भरल्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या वळविण्यात आल्या होत्या.हिंदमाता परिसरही पाण्यात बुडाला होता, पहिल्याच पावसात ही परिस्थिती मुंबईत निर्माण झाल्यामुळे नालेसफाई झाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मुंबईतील नाल्यांची ११३ टक्के सफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र विरोधी पक्ष नेता या नात्याने पावसाळ्यापूर्वी केलेल्या दौºयात २९ ठिकाणी नाले गाळात असल्याचे दिसून आले होते. त्याबाबत तक्र ार केल्यानंतरही कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते
दरवर्षी नालेसफाईचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. परंतु यंदा कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात पालिकेची यंत्रणा व्यस्त होती. परिणामी, नाल्यांमधील
गाळ काढण्याचे काम मे महिन्यात सुरू झाले.
पालिका प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार मुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्यानंतरही पाणी तुंबतेच कसे? सत्ताधाऱ्यांनी मुंबईची तुंबई करून दाखवली आहे. ब्रिटानिया पंपिंग स्टेशन चार वर्षांपूर्वी बांधण्यात आले, त्यानंतरही हिंदमाता परिसर पाण्याखाली जातो ते कसे? त्यामुळे नालेसफाईच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी.
- भालचंद्र शिरसाट, भाजप नेते