Join us

मुंबई महापालिकेत आता पशूंच्या आरोग्यासाठीही स्वतंत्र खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 2:18 AM

मानवाला होणाऱ्या आजारांपैकी तीनशेहून अधिक आजार हे पशूंचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून होतात

मुंबई : मानवाला होणाऱ्या आजारांपैकी तीनशेहून अधिक आजार हे पशूंचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून होतात. यामुळेच प्राण्यांच्या अनारोग्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याने, मुंबईत पशू आरोग्यासाठी स्वतंत्र ‘पशुवैद्यकीय आरोग्य खाते’ सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या खात्यांतर्गत अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय-दवाखाने, प्राण्यांपासून माणसांना होणाºया रोगांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्राणिगणना, श्वान नियंत्रण कार्यालय, श्वान निर्बीजीकरण, श्वान व मांजरांसाठी स्मशानभूमी, गुरे कोंडवाडा यांचा समावेश असणार आहे.प्राण्यांपासून होणाºया आजारांना ‘झूनॉटिक डिसिजेस’ असे म्हटले जाते. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रॅबीज, अ‍ॅन्थ्रॅक्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या आजारांचा समावेश होतो. प्राण्यांसाठी स्वतंत्र आरोग्य खाते असावे, अशी मागणी बºयाच काळापासून होत होती. या मागणीला सार्वजनिक आरोग्य खाते व महापालिकेच्या महासभेची मंजुरी मिळाली आहे.या अंतर्गत महालक्ष्मी परिसरात अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बांधण्यात येणाºया या रुग्णालयात प्राण्यांसाठी सीटी स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी, क्ष-किरण यांसारख्या सुविधांसह अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग असणार आहे. या रुग्णालयात एका वेळी ३०० छोट्या प्राण्यांना (कुत्रे, मांजरी इत्यादी) दाखल करण्याची सुविधा असणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली.मुंबईत भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण हा वादाचा मुद्दा ठरला आहे. प्राण्यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र खाते स्थापन झाल्यामुळे भटके श्वान पकडण्याची व त्यांचे निर्बीजीकरण करण्याची जबाबदारी असणाºया महालक्ष्मी, वांद्रे (प.), मालाड (प.) व मुलुंड (प.) येथील चार श्वान नियंत्रण कार्यालये याच खात्याच्या अंतर्गत येणार आहेत.त्याचप्रमाणे, श्वान पाळण्याचा परवाना, श्वान निर्बीजीकरणाचे व्यवस्थापन, पाळीव प्राण्यांना व भटक्या श्वानांना वार्षिक रेबिज / लेप्टोस्पायरोसिस लसीकरण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.अर्थसंकल्पीय तरतूदसन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये पशुवैद्यकीय सेवांसाठी रुपये १४.५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे खाते सुरू होऊ शकेल.पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे मुख्यालयखार (प.) परिसरात पोलीस स्टेशनजवळ असणाºया महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात बांधण्यात येणाºया नव्या इमारतीमध्ये, पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे मुख्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर प्राण्यांसाठी क्ष-किरण, सोनोग्राफी इत्यादी सोईसुविधा असणारा अत्याधुनिक दवाखाना, तर पाचव्या मजल्यावर प्राण्यांपासून माणसांना होणाºया रोगांच्या निदानाकरिता अत्याधुनिक प्रयोगशाळादेखील प्रस्तावित करण्यात आली आहे.प्राणिगणनाव माहिती संकलन२०१२ मध्ये करण्यात आलेल्या १९व्या पशुगणनेनुसार मुंबईत ४० हजार ५९८ कुटुंबांमध्ये पाळीव जनावरे आहेत. ही संख्या वाढत्या शहरीकरणाबरोबर आणि वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत आहे. या व्यतिरिक्त मनपा क्षेत्रात भटक्या जनावरांची संख्यादेखील मोठी आहे. या पाळीव प्राण्यांच्या किंवा भटक्या जनावरांच्या आरोग्याबाबतअथवा रोगांबाबत तपशीलसंकलित करण्यासही स्वतंत्र खात्यामुळे चालना मिळणारआहे.