मुंबई मनपा 'पी पूर्व' विभाग; आयटी पार्कमुळे वाढले ‘वॉर्ड’ चे महत्त्व 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:43 AM2024-01-02T10:43:10+5:302024-01-02T10:44:14+5:30

पी उत्तर विभागाचे पी पश्चिम आणि पी पूर्व असे विभाजन झाले असून हिऱ्यांचा वॉर्ड आणि आय टी पार्कमुळे त्याला महत्त्व आहे.

Mumbai municipal corporation P East Division the importance of 'ward' has increased due to the IT park | मुंबई मनपा 'पी पूर्व' विभाग; आयटी पार्कमुळे वाढले ‘वॉर्ड’ चे महत्त्व 

मुंबई मनपा 'पी पूर्व' विभाग; आयटी पार्कमुळे वाढले ‘वॉर्ड’ चे महत्त्व 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभागातून विभाजन करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पी पूर्व विभाग कार्यालयाच्या प्रारंभिक सेवा आता कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या कार्यालयाचे लोकार्पण हे राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले. पी उत्तर विभागाचे पी पश्चिम आणि पी पूर्व असे विभाजन झाले असून हिऱ्यांचा वॉर्ड आणि आय टी पार्कमुळे त्याला महत्त्व आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम : पूर्व : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संतोषनगर, आप्पापडा, खडकपाडा
पश्चिम : रेल्वे ट्रॅक, हाजी बापू रोड
उत्तर : टाईम्स ऑफ इंडिया इमारत, आकुर्ली रोड
दक्षिण : चिंचोली बंदर रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, फिल्मसिटी रोड

वॉर्डाचे वैशिष्ट्य: पी/ पूर्व विभागामध्ये पूर्वी मालाड स्टोनक्वारी होत्या व आज देखील मालाड स्टोन प्रसिद्ध आहे.  मालाड पूर्व येथे उच्च दर्जाचे आयटी पार्क स्थित आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव व उद्यान मालाड पूर्व येथे स्थित आहे.  पी पूर्व येथे मुंबईतील मोठे डायमंड मार्केट आहे.

मुख्य समस्या:  रस्ते व वाहतूक कोंडीची आहे. मालाड पूर्व कुरार, आप्पा पाडा येथे चिंचोळी रस्ते असून रस्ते रुंदीकरण करणे गरजेचे आहे. रेशनिग कार्यालय, पालिकेचा सुसज्ज जलतरण तलावाची नागरिकांची मागणी आहे.

महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :

दक्षा पटेल : वॉर्ड क्रमांक ३६ 
प्रतिभा शिंदे : वॉर्ड क्रमांक ३७ 
आत्माराम चाचे : वॉर्ड क्रमांक ३८ 
विनया सावंत : वॉर्ड क्रमांक ३९ 
ॲड. सुहास वाडकर : वॉर्ड क्रमांक ४० 
तुळशीराम शिंदे : वॉर्ड क्रमांक ४१ 
धनश्री भरडकर : वॉर्ड क्रमांक ४२ 
विनोद मिश्रा : वॉर्ड क्रमांक ४३ 
संगीता शर्मा : वॉर्ड क्रमांक ४४ 

किरण दिघावकर - सहायक पालिका आयुक्त: पी - पूर्व विभागात मुख्य समस्या रस्ते व वाहतूक कोंडीची आहे. त्यासाठी पी पूर्व विभागामार्फत विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. यामध्ये गोरेगाव मुलुंड लिंक रोड, पठाणवाडी रोड, खडकपाडा रोडचा समाविष्ठ आहे. तसेच, गोरेगाव मुलुंड लिंक रोड ते कांदिवली पूर्व लोखंडवाला डी. पी. रोड याचाही यात समावेश आहे.

शैक्षणिक संस्था: आर. के. कॉलेज, डीटीएसएस कॉलेज ऑफ कॉमर्स, निर्मला कॉलेज ऑफ कॉमर्स, घनश्यामदास जालान कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स

पर्यटन स्थळे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव व उद्यान, आय टी पार्क, मालाड पूर्व

रुग्णालये:  ०२ डिस्पेन्सरी, स. का. पाटील महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, म. वा. देसाई रुग्णालय

Web Title: Mumbai municipal corporation P East Division the importance of 'ward' has increased due to the IT park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई