मुंबई महानगरपालिका ‘पी पश्चिम’ वॉर्ड ; नैसर्गिक तलावांचा केंद्रबिंदू ‘पी पश्चिम’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:25 AM2023-12-25T10:25:33+5:302023-12-25T10:26:43+5:30
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातून विभाजन करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पी पूर्व विभाग कार्यालयाच्या प्रारंभिक सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातून विभाजन करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पी पूर्व विभाग कार्यालयाच्या प्रारंभिक सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सेवांसह सदर कार्यालय लोकार्पण समारंभ राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर २०२३ पार पडला. त्यामुळे ‘पी उत्तर’ विभागाचे ‘पी पश्चिम’ आणि ‘पी पूर्व’ असे विभाजन झाले आहे.
हद्द-पूर्व-पश्चिम :
पूर्व : रेल्वे ट्रॅक, साईनाथ रोड
पश्चिम : गाव तलाव, गोराई मनोरी रोड, मनोरी गाव
उत्तर : गोरसवाडी रोड, मिलाप थिएटर
दक्षिण : चिंचोली बंदर रोड, चिंचोली फाटक
वॉर्डाचे वैशिष्ट्य: पी पश्चिम विभागात मार्वे बीच, अक्सा बीच, दाणापाणी बीच, एरंगळ बीच, मढ बीच असे ५ समुद्रकिनारे येतात. तसेच, मढ किल्ला आणि संत. बोनव्हेंचर चर्च हेसुद्धा पी पश्चिम विभागात येतात. माइंड स्पेस आयटी पार्क आहे. पी पश्चिम विभागात एकूण १७ नैसर्गिक तलाव अस्तित्वात आहे.
येथे ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव विकसित करण्यात आला आहे. मनोरी गाव हेसुद्धा पी पश्चिम विभागात येते. पी पश्चिम येथे भारतातील पहिली पशु दहन वाहिनीदेखील सुरू करण्यात आली. मालाडमध्ये सोमवार बाजारदेखील आहे.
मुख्य समस्या : पी पश्चिम विभागातील मुख्य समस्या ती वाहतूक कोंडीची, त्यासाठी पी पश्चिम विभागामार्फत विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असून, त्यात एस. व्ही. रो, आनंद रोड (स्टेशन रोड), मार्वे रोडचा समाविष्ट आहे.
महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :
गीता भंडारी - वॉर्ड क्र. ३२
वीरेंद्र चौधरी - वॉर्ड क्र. ३३
कमरजहाँ सिद्धिकी - वॉर्ड क्र. ३४
सेजल देसाई - वॉर्ड क्र. ३५
योगिता कोळी - वॉर्ड क्र. ४६
जया तिवाना - वॉर्ड क्र. ४७
सलमा अलमेलकर - वॉर्ड क्र. ४८
संगीता सुतार - वॉर्ड क्र. ४९
किरण दिघावकर-सहाय्यक पालिका आयुक्त : पी पश्चिम विभागातील मुख्य समस्या वाहतूक कोंडीची असून, पालिकेच्या पी पश्चिम विभागामार्फत विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असून, त्यात एस. व्ही. रोड, आनंद रोड, मार्वे रोडचा समाविष्ट आहे.
नोएडाच्या धर्तीवर सीटीएस येथील २८,००० चौ. मीटर जागेत मुंबईतील पहिले वेदिक थीम पार्क उभारण्याचे काम सुरू आहे. एस. व्ही. रोड येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
शैक्षणिक संस्था: नगिनदास खांडवाला कॉलेज ऑफ कॉमर्स आर्ट्स, घनश्याम दास सराफ कला वाणिज्य महाविद्यालय, प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स.
पर्यटन स्थळे : मार्वे बीच, मनोरी गाव, आक्सा बीच, दानापाणी बीच, मढ किल्ला,
मढ बीच, लोटस तलाव
०२ रुग्णालये डिस्पेन्सरी
०४ जनरल हॉस्पिटल मालवणी