मुंबई मनपा ‘एस’ वॉर्ड; डोंगराळ भाग, कुशल-अकुशल श्रमिकांनी निर्माण केलेली वस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:23 AM2024-01-11T10:23:08+5:302024-01-11T10:24:16+5:30

डोंगराळ भाग जास्त असल्याने दरडी कोसळण्याच्या घटनावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणासमोर आहे.

Mumbai municipal Corporation s ward hilly areas settlements created by skilled and unskilled labour | मुंबई मनपा ‘एस’ वॉर्ड; डोंगराळ भाग, कुशल-अकुशल श्रमिकांनी निर्माण केलेली वस्ती

मुंबई मनपा ‘एस’ वॉर्ड; डोंगराळ भाग, कुशल-अकुशल श्रमिकांनी निर्माण केलेली वस्ती

भांडुप, कांजूर, विक्रोळी तसेच पवईतील काही भाग व्यापलेल्या एस. एस. विभागाअंतर्गत पुनर्विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक ठिकाणी मूलभूत सोयी सुविधांचा अभाव पहावयास मिळतो. दुसरीकडे डोंगराळ भाग जास्त असल्याने दरडी कोसळण्याच्या घटनावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणासमोर आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम: 

पूर्व : अरबी समुद्र 
पश्चिम : विहार तलाव 
उत्तर : गोरेगाव मुलुंड लिंक रोड 
दक्षिण : विक्रोळी स्थानक पूर्व आणि पश्चिम 

वॉर्डाचे वैशिष्ट्य :

 भांडुप ही औद्योगिक वसाहतींमधील कुशल-अकुशल श्रमिकांनी निर्माण केलेली वस्ती. इथला बहुतांश मतदार बैठ्या चाळींमध्ये वास्तव्य करतो. लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा विखुरलेले कारखाने बंद पडल्याने त्या जागेत टोलेजंग गृहसंकुले उभी राहिली. हा मराठी विशेषत: कोकणी मतदारसंघ आहे. तर विक्रोळीत आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वस्ती अशी ओळख असलेल्या विक्रोळीत मराठी, बहुजन मतदारांचे प्राबल्य आहे. 

मुख्य समस्या :

 या प्रभागाच्या रखडलेले झोपू प्रकल्प आहे. सुसज्ज रुग्णालय नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. मैदानाची कमतरता असल्याने लहान मुलांनी खेळायचे कुठे हा प्रश्न आहे. येथील अरुंद रस्त्यांमुळे सदैव वाहतूक कोंडी असते. प्रभागातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान आहे. 

महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :

साक्षी दळवी : वॉर्ड क्र. ११२ 
दीपमाला बढे : वॉर्ड क्र. ११३ 
रमेश कोरगावकर : वॉर्ड क्र. ११४ 
उमेश माने : वॉर्ड क्र. ११५ 
जागृती पाटील : वॉर्ड क्र. ११६ 
सुवर्णा करंजे : वॉर्ड क्र. ११७ 
उपेंद्र सावंत : वॉर्ड क्र. ११८ 
मनीषा रहाटे : वॉर्ड क्र. ११९ 
राजेश्वरी रेडकर : वॉर्ड क्र. १२० 
चंद्रावती मोरे : वॉर्ड क्र. १२१ 
वैशाली पाटील : वॉर्ड क्र. १२२ 
दीपाली गोसावी : वॉर्ड क्र.१०९ 
आशा कोपरकर: वॉर्ड क्र. ११० 
सारिका पवार: वॉर्ड क्र. १११

भास्कर कसगीकर- सहायक पालिका आयुक्त : या विभागात डोंगराळ भाग जास्त असल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतात. तसेच, नागरी समस्येसंबंधित कुठलीही अडचण असल्यास तत्काळ एस विभागाशी संपर्क साधा. पालिका सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर असते.

पर्यटन स्थळे : पवई तलाव, भांडुप फ्लेमिंगो सेंच्युरी 

शैक्षणिक संस्था : पवई आयआयटी, डीएव्ही, विकास, एनईएस रत्नम, व्ही.के.कृष्णा मेनन

रुग्णालये:  ०७, ०३ महानगरपालिका प्रसूतिगृहे

Web Title: Mumbai municipal Corporation s ward hilly areas settlements created by skilled and unskilled labour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.