मुंबई मनपा टी वॉर्ड: राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू अन् डोंगराळ भागातील झोपडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:10 AM2023-12-28T10:10:08+5:302023-12-28T10:16:09+5:30

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत.

Mumbai Municipal Corporation t ward a politically focal ward in mumbai | मुंबई मनपा टी वॉर्ड: राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू अन् डोंगराळ भागातील झोपडपट्टी

मुंबई मनपा टी वॉर्ड: राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू अन् डोंगराळ भागातील झोपडपट्टी

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत.वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या रस्त्यामुळे सुमारे १२.२० किलोमीटरच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य तर होईलच, सोबत मोठ्या प्रमाणात इंधन बचत होईल. त्यासोबतच येथील राष्ट्रीय उद्यानलगत तसेच डोंगराळ भागातील झोपडी धारकांचे प्रश्न रखडलेले आहे. राजकीय दृष्ट्या येथील विभाग महत्त्वाचा आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम:

पूर्व : ऐरोली चेकनाका ते हरी ओम नगर
पश्चिम : संजय गांधी नॅशनल पार्क
उत्तर : चेक नाका
दक्षिण : मुलुंड-गोरेगाव लिंक रोड

वॉर्डाचे वैशिष्ट्य : पूर्वेला मराठी तर पश्चिमेला गुजराती वस्ती असलेल्या मुलुंडमध्ये गेल्या २० वर्षांपासून भाजपचे सरदार तारासिंह आमदार होते. भाजपसाठी शहरात सुरक्षित मतदारसंघांमध्ये मुलुंडची गणना होते.

व्यापारी वर्ग अधिक आहे. याच, भागात मुंबईतील महत्त्वाच्या नाट्यगृहांपैकी जुने असे कालिदास नाट्यगृह आहे. अनेक राजकीय तसेच कलाकार, स्वातंत्र्यसेनानी या भागात राहण्यास आहेत.

मुख्य समस्या :

प्रभागात असणाऱ्या राष्ट्रीय उद्यानातील झोपडी धारकांचे पुनर्वसन रखडलेले आहे. त्याचबरोबर पूर्व भागातून आत-बाहेर करण्यासाठी एकच मार्ग असल्याने अनेकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. याचबरोबर पूर्व भागात पेट्रोलपंपाची व्यवस्था नाही. वाहनचालकांना पेट्रोलसाठी पश्चिमेकडे धाव घ्यावी लागते. प्रभागातील पगडी प्रकारातील इमारतींमधील मालक-भाडेकरू वाद असल्याने सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.

महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :

मनोज कोटक : वॉर्ड क्र. १०३ 
प्रकाश गंगाधरे : वॉर्ड क्र. १०४ 
रजनी केणी : वॉर्ड क्र. १०५ 
प्रभाकर शिंदे : वॉर्ड क्र. १०६ 
समिधा कांबळे : वॉर्ड क्र. १०६ 
नील सोमय्या : वॉर्ड क्र. १०७ 

अजय पाटणे, सहायक पालिका आयुक्त - राजकीयदृष्ट्या येथील परिसर महत्त्वाचा आहे. मुलुंडमध्ये पुनर्वसनाचा मुद्दा प्रमुख आहे. मुलुंड पूर्व येथे सुरू असलेल्या प्रकल्पबाधित वसाहतीच्या बांधकामाला नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता त्यांना समजावण्याचे आव्हान आहे.

पर्यटनस्थळे: बालराजेश्व्रर मंदिर, अंबाजी धाम मंदिर, मोमाई माता मंदिर, संभाजी गार्डन, चिंतामणी देशमुख उद्यान

शैक्षणिक संस्था
डिडीयु रोड, जी. व्ही. स्किम, वझे-केळकर काॅलेज, आर. आर. टी. रोड महापालिका शाळा, मुलुंड कॅम्प शाळा, गुरू गोविंद सिंह शाळा, सायक्लोन सेंटर

रुग्णालये :

०२ डिस्पेन्सरी 

०७ अगरवाल हॉस्पिटल, वीर सावरकर हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल, हिरा मोंगी, धन्वंतरी, एन. एम. मेडिकल सेंटर, सुश्रुषा

Web Title: Mumbai Municipal Corporation t ward a politically focal ward in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.