Join us

मुंबई महापालिकेची सॅप प्रणाली २६ नोव्हेंबरपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 3:34 PM

SAP system closed : अद्ययावतीकरण काम सुरू

मुंबई : सुविधा देण्यासाठी उपयोगात येणा-या सॅप संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम १३ नोव्हेंबरपासून सुरू झालेले हे काम २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे पालिकेकडून नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, निविदा भरणे किंवा कार्यादेश देणे, अधिदान करणे इत्यादी कार्यवाही करता येणार नाही. नागरिक, कंत्राटदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.१३ नोव्हेंबर २०२० पासून दिनांक २३ नोव्हेंबरपर्यंत प्रणाली बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि, तांत्रिक बाबींमुळे अधिक कालावधी हवा असल्याने ही मुदत आता २६ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. सॅप प्रणालीव्यतिरिक्त इतर सेवा या नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. मालमत्ता कराचा भरणा, जलदेयकांचा भरणा, ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगीच्या अर्जाकरिता वेबसाईट्स कार्यान्वित राहणार आहेत. परिणामी नागरिकांची गैरसोय होणार नाही. सॅप या प्रणालीचा उपयोग करुन नागरिक, कंत्राटदार तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्याशी निगडित कामकाजाच्या गरजा पूर्ण करण्यात येतात. प्रणालीमध्ये नवी वैशिष्ट्ये समाविष्ट करुन ती अद्ययावत करण्यात येणार आहे. यामुळे प्रणाली अधिक सुरक्षित होणार आहे. सध्या कार्यान्वित प्रणालीचे सर्व्हर्स बंद करुन त्याचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. असे केल्याने व्यवहारांची सुसंगता राखली जाईल.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकातंत्रज्ञान