Join us

मुंबई महापालिकेतील अभियंत्याने साकार केली ‘गणेशा’ सांस्कृतिक कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 2:42 AM

संजय महाले हे मुंबई महानगरपालिकेत उपमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असून त्यांना संगीताची विलक्षण आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : गणपती म्हणजे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत. प्रख्यात विदेशी ट्यून ‘टकीला’चा बेमालूम वापर करून भारतातील आठ प्रांतांतील विविध वाद्ये व नृत्य यांचा वापर करून गणपती बाप्पासाठी उच्च दर्जाच्या संस्कृतीची निर्मिती केली आहे.त्यासाठी ग्रामीण ढोलताशा (लेझीम) व लावणी (महाराष्ट्र), घुमूर (राजस्थान), गरबा (गुजरात), कव्वाली (लखनौ), कथ्थक व कुचिपुडी (केरळ), भांगडा (पंजाब) व कार्निव्हल (वेस्टर्न कल्चर-गोवा) या सर्व स्टाईलचा उत्तम वापर केला आहे. या सर्व कलाकृतींचे नाव ‘गणेशा’ असे ठेवले असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उपमुख्य अभियंता संजय महाले यांनी ‘लोकमत’ला दिली.‘गणेशा’ या सांस्कृतिक कलाकृतीची संकल्पना, दिग्दर्शन, गायन व निर्देशन त्यांनी केले आहे. महापालिकेतील अभियंत्याच्या सांस्कृतिक कलाकृतीला सध्या सोशल मीडियावर उत्तम दाद मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रूमच्या कार्यप्रणालीवर एक शॉर्टफिल्म तयार केली असून, त्याला सर्व स्तरावर उत्तम दाद मिळाली आहे.संजय महाले हे मुंबई महानगरपालिकेत उपमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असून त्यांना संगीताची विलक्षण आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.सदर कलाकृतीत नृत्यांगना धनश्री दळवी, दीपिका, संध्या कामत व स्वत: संजय महाले यांचा समावेश आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून तलत अजिज, सुदेश भोसले, वैशाली सामंत व वैशाली माडे यांचाही सहभाग आहे. सदर कलाकृतीचे संगीत संयोजन प्रख्यात संगीतकार नितीन शंकर यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन लॉलीपॉप यांनी केले आहे.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई महानगरपालिका