मुंबई महापालिका अकार्यक्षम

By admin | Published: April 29, 2015 01:03 AM2015-04-29T01:03:28+5:302015-04-29T01:03:28+5:30

नागरी समस्या सोडविण्यात मुंबई महापालिका अकार्यक्षम आणि निष्काळजी बनली असल्याचा निष्कर्ष प्रजा फाउंडेशनने एका पाहणी अहवालातून काढला आहे़

Mumbai Municipal Inoperable | मुंबई महापालिका अकार्यक्षम

मुंबई महापालिका अकार्यक्षम

Next

नगरसेवक बेफिकीर : प्रजा फाउंडेशनचा पाहणी अहवालातून निष्कर्ष
मुंबई : नागरी समस्या सोडविण्यात मुंबई महापालिका अकार्यक्षम आणि निष्काळजी बनली असल्याचा निष्कर्ष प्रजा फाउंडेशनने एका पाहणी अहवालातून काढला आहे़ प्रभाग समितीच्या बैठकांमध्ये अनेक नगरसेवक तोंडही उघडत नाहीत. या बैठकांची हजेरीही आठ टक्क्यांनी घसरली असल्याची गंभीर बाबही या अहवालातून उजेडात आली आहे़
दरवर्षीप्रमाणे प्रजा या संस्थेने पालिकेच्या १७ प्रभाग समित्यांमधील कामकाजाचा आढावा घेऊन अहवाल प्रकाशित केला आहे़ यामध्ये नागरी समस्यांऐवजी रस्ते व चौकांच्या नामकरणाचे सर्वाधिक प्रश्न विचारले जात असल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे़ प्रभाग समित्यांच्या बैठकांमधील नगरसेवकांची हजेरी आठ टक्क्यांनी तर प्रश्न विचारण्याचे प्रमाण दोन टक्क्यांनी घटले असल्याचेही निदर्शनास आले आहे़ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई होत आहे़ अशा वेळी शहराचा दर्जा राखणार कसा, असा सवाल प्रजा फाउंडेशनचे संस्थापक निताई मेहता यांनी उपस्थित केला आहे़

प्रभाग समित्यांमध्ये नगरसेवकांची हजेरी आठ टक्क्यांनी घटली़ (२०१२ ते २०१४ जाने़ ते डिसेंबर)
बैठका हजेरीप्रश्न
२०९८२६७९
२६५७९९८९
२९८७१९७०

२०१४ - ६६ हजार ७४७ नागरी तक्रारींपैकी ३५ टक्के सोडविण्यात आल्या़ ६३ टक्के समस्यांचे समाधान अद्याप करण्यात आलेले नाही़
दूषित पाण्याची समस्या, कचरा उचलणे, नाले तुंबणे, खड्डे अशा समस्या तीन दिवसांमध्ये सोडविणे अपेक्षित आहे़ परंतु यासाठी सरासरी १७ दिवसांचा कालावधी लागत आहे़
भांडुप वॉर्डात दूषित पाणीपुरवठा हा प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल ८७ दिवस लागले़

अभ्यास न करताच नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकीत हजेरी लावत आहेत़ त्यामुळे हरकतीचे मुद्दे उपस्थित करण्याचे प्रमाण अधिक आहे़ २०१४ मध्ये ९७० प्रश्नांपैकी हरकतीचे मुद्दे ७५ टक्के होते़

टॉप पाच समस्या
समस्यातक्रारी टक्केवारी (वाढ)
२०१४२०१२-१३२०१३-१४
पाणीपुरवठा७६४५-२़३२५
कचरा७३३१-१५३२
कीटकनाशक फवारणी५०४८११४४
गटारे, सांडपाणी११६०-४़७२९़६
शौचालये२५७१९४५

२०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये रस्त्यांवरील तक्रारींमध्ये ४८़३ टक्के घट.
मलनिस्सारण वाहिन्यांच्या तक्रारींमध्ये २६़१ टक्के वाढ.
पाण्याच्या तक्रारी २५़८ टक्के वाढल्या.
कचरा वेळेत उचलला जात नसल्याच्या तक्रारीत ३२़८ टक्के वाढ़

Web Title: Mumbai Municipal Inoperable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.