मुंबई मनपा वॉर्ड 'के पश्चिम': पायाभूत सुविधा राखणे मोठे आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 09:43 AM2023-12-17T09:43:13+5:302023-12-17T09:43:47+5:30
अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ल्याचा काही भाग या विभागात येतो. या विभागाची लोकसंख्या ही सात लाखांच्या पुढे आहे.
अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ल्याचा काही भाग या विभागात येतो. या विभागाची लोकसंख्या ही सात लाखांच्या पुढे आहे. तसेच महत्वाची पर्यटन स्थळे आणि महत्वाच्या शैक्षणिक संस्था असल्याने येथे नेहमी गर्दी दिसून येत आहे. कामानिमित्त आणि शिक्षणासाठी रोज अंदाजे लाखो लोक ये-जा करतात. त्यामुळे याचा भार पायाभूत सुविधांवर पडतो. त्यामुळे स्वच्छता आणि पायाभूत सुविधा राखणे हे मोठे आव्हान आहे.
हद्द पूर्व-पश्चिम
पश्चिम- अरबी समुद्र, जुहू समुद्रकिनारा
उत्तर- ओशिवरा नदी
दक्षिण- मिलन सबवे, सांताक्रूझ
वॉर्डाचे वैशिष्ट्य
>>मुंबईच्या पश्चिम विभागातील अंधेरी (पश्चिम) हे पर्यटन स्थळ असलेले तसेच सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध व्यक्ती यांना सामावून घेणारे व शहरातील मध्यम व उच्चवर्गीय लोकांचा समावेश असलेले सर्वात वर्दळीचे प्रमुख उपनगर आहे.
>> शहराच्या सुस्थितीत असलेल्या पायाभूत सुविधा व सागरी किनारा असल्यामुळे आलिशान राहणीमान परिपूर्ण होते.
>> जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा, व्यावसायिक सुविधा, मोठमोठी मनोरंजन उद्याने असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात लोकांची रहदारी असते.
>> आरटीओ, सर्व्हिस टॅक्स डिव्हिजन, अंधेरी अग्निशमन केंद्र, एलआयसी कार्यालय, खादी व ग्रामोद्योग, यशराज स्टुडिओ, फिल्मालय स्टुडिओ, शहाजी राजे क्रीडा संकुल, इस्कॉन मंदिर, गिल्बर्ट हिल.
महापालिका प्रभाग आणि माजी नगरसेवक
प्रतिमा खोप : वॉर्ड क्र. ५९
योगीराज दाभाडकर : वॉर्ड क्र. ६०
राजुल पटेल : वॉर्ड क्र. ६१
राजू पेडणेकर : वॉर्ड क्र. ६२
रंजना पाटील : वॉर्ड क्र. ६३
शाहिदा खान : वॉर्ड क्र. ६४
अल्पा जाधव : वॉर्ड क्र. ६५
मेहर हैदर : वॉर्ड क्र. ६६
सुधा सिंग : वॉर्ड क्र. ६७
रोहन राठोड : वॉर्ड क्र. ६८
रेणू हंसराज : वॉर्ड क्र. ६९
सुनीता मेहता : वॉर्ड क्र. ७०
अनिष मकवानी : वॉर्ड क्र. ७१
शैक्षणिक संस्था
भवन्स कॉलेज, विलेपार्ले केळवाणी मंडळ, मिठीबाई कॉलेज, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, फिशरीज इन्स्टिट्यूट
महत्त्वाची पर्यटनस्थळे
जुहू बीच, वर्सोवा बीच, इस्कॉन मंदिर, गिल्बर्ट हिल
वॉर्डातील मुख्य समस्या
विभागातील उच्चवर्गीय मोठी लोकसंख्या तसेच दर्जेदार व पायाभूत सुविधा असल्यामुळे वाहतूक कोंडी व रस्त्यावरील पार्किंग या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. गोखले पूल दुरुस्तीकरीता बंद असल्याने अंधेरी पूर्व-पश्चिम भागातील रहदारी बंद आहे व अनेक विकासाची कामे रस्त्यांची, मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या आहे.
प्रख्यात व्यक्तींचा वावर, महत्त्वाची पर्यटन स्थळे, मेट्रोची कामे, गोखले ब्रिजचे चालू असलेले कामे त्यामुळे जबाबदारी मोठी आहे. गणपती विसर्जन, छटपूजा अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सोयीसुविधा पुरविणे ही देखिल जबाबदारी आहे. विभागाची लोकसंख्या सुमारे सात लाख असली तरी कामानिमित्त व शिक्षणासाठी रोज अंदाजे लाखो लोक ये-जा करतात. त्यामुळे स्वच्छता व पायाभूत सुविधा राखणे हे मोठे आव्हान आहे. समुद्रकिनारी स्वच्छता व सौंदर्यीकरणाकरिता विविध एनजीओ (स्वयंसेवी संस्था), प्रसिद्ध व्यक्ती येत असल्यामुळे इतर प्राधिकरणांसोबत समन्वय साधणे महत्वाचे आहे.
- डॉ. पृथ्वीराज चौहान, सहायक आयुक्त के/पश्चिम विभाग
कार्यालयाचा पत्ता
बीईएसटी बस डेपोसमोर, पालीराम पथ, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८
या क्रमांकावर मिळेल सहकार्य
०२२ २६२३२९६९
लोकसंख्या ७.१८ लाख
रेल्वे स्थानक- अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी
लोकप्रतिनिधी
खासदार गजानन कीर्तीकर, शिंदे गट
खासदार पूनम महाजन, भाजप
आमदार पराग अळवणी, भाजप
आमदार अमित साटम, भाजप
आमदार डॉ. भारती लव्हेकर, भाजप