विसर्जनासाठी मुंबई मनपा सज्ज, १० हजार कर्मचारी; ७१ नियंत्रण कक्ष अन् ४६ जर्मन तराफे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 02:05 PM2023-09-26T14:05:52+5:302023-09-26T14:06:51+5:30

मुंबईतील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.

Mumbai Municipality ready for immersion 10 thousand employees 71 control rooms and 46 German rafts | विसर्जनासाठी मुंबई मनपा सज्ज, १० हजार कर्मचारी; ७१ नियंत्रण कक्ष अन् ४६ जर्मन तराफे!

विसर्जनासाठी मुंबई मनपा सज्ज, १० हजार कर्मचारी; ७१ नियंत्रण कक्ष अन् ४६ जर्मन तराफे!

googlenewsNext

मुंबई

मुंबईतीलगणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. विसर्जन कोणत्याही अडथळ्याविना पार पडावे यासाठी चौपाट्या, तलाव आणि कृत्रिम तलावांवर महापालिकेचे १० हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच ७१ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. विसर्जनाच्या सुविधेसाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १९८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. तसंच विसर्जनासाठी ४६ जर्मन तराफे, ७६४ जीवरक्षक आणि ४८ मोटरबोटी तैनात करण्यात आल्या आहेत. 

अनंत चतुदर्शीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी गणेश विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी मुंबई मनपाकडून यंदाही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा विसर्झनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण १९८ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली. 

गाडी वाळूत रुतू नये, यासाठी ४६८ स्टील प्लेटचा रस्ता
गणेश विसर्जनासाठी येणारी वाहनं वाळूत रुतू नयेत यासाठी चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४६८ स्टीलच्या प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी अनेक ठिकाणी ४६ जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६४ जीवनरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात करण्यात आल्या आहेत. 

मुंबईकरांनी विसर्जन स्थळाची काळजी आणि स्वच्छता ठेवावी यासाठी जबाबदारीने वागण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. महापालिका आणि मुंबई पोलीस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.

Web Title: Mumbai Municipality ready for immersion 10 thousand employees 71 control rooms and 46 German rafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.