मुंबई: अमेरिकेतल्या एका व्यावसायिकाच्या मुलीनं तीन वर्षं लैंगिक शोषण सहन केल्यानंतर 9 वर्षांनी आरोपीला तुरुंगात धाडलं आहे. त्यासाठीच ती भारतात परतली असून, रविवारी त्या शिक्षकाला अटक करण्यात आली. पीडिता जेव्हा 12 वर्षांची होती तेव्हा ती अमेरिकेला गेली होती आणि पाच वर्षं काऊन्सलिंगनंतर तिनं ही घटना उघड केली. संगीताच्या शिक्षकानं अंधेरीतल्या घरात लैंगिक शोषण केल्याचं तिनं सांगितलं.आरोपी भरत पांचाळ ऊर्फ राजूने पीडितेला संगीत शिकवण्याच्या नावाखाली 2007-2009 या तीन वर्षं तिचं लैंगिक शोषण केलं. ज्यावेळी पीडिता 9 वर्षांची होती. आता अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकत असलेली पीडिता रविवारी भारतात परतली आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं आणखी काही इतर मुलींसोबत असं केलं आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. 5 वर्षं काऊन्सलिंगनंतर सांगितला त्रासअधिकाऱ्यानं सांगितलं की, पीडितेची तक्रार नोंदवल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी आरोपी पांचाळला अटक केली आहे. पांचाळच्या विरोधात आयपीसी कलम 354, 506 आणि 509अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पांचाळला पोलीस स्टेशनमध्ये पाहून पीडिता मोठ्यानं किंचाळली, अशी माहिती वडिलांनी दिली आहे. त्यानं 2007-10दरम्यान अनेक गुन्हे केले आहेत. माझ्या मुलीनं जगण्याची आशा सोडली होती, जवळपास 5 वर्षं काऊन्सलिंग केल्यानंतर तिनं आपलं दुःख आणि झालेला त्रास सांगितला. एफआयआरमध्ये पीडितेच्या आईनं सांगितलं की, तो आमच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी 4-5 वाजता संध्याकाळी शिकवणी घेण्यासाठी तयार होता. पहिल्यांदा सर्वकाही ठीक होतं. कालांतरानं मुलीचं वागणं-बोलणं बदलत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. बऱ्याचदा मी तिला रात्रीचं रडताना पाहिलं आहे. मी तिला विचारलं तेव्हा तिनं काहीही सांगितलं नाही. 2010ला जेव्हा ती 8व्या इयत्तेत गेली तेव्हा तिनं सांगितलं की, शाळेत आम्हाला लैंगिक शिक्षणासंदर्भात माहिती दिली. मी तिला विचारलं तुझ्यासोबत काही झालं आहे का?, तेव्हा ती बोलता बोलता मध्येच थांबली आणि शांत झाली. रात्री मध्येच उठून ओरडत होतीपीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, 2011मध्ये आम्ही राहतं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. 2015मध्ये आम्ही अमेरिकेतल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेलो होतो. पांचाळनं तिचं शोषण केल्याचं तिनं सांगितलं. तो तिला आक्षेपार्ह फोटो दाखवत होता आणि तोकडे कपडे घालण्यास सांगत होता.
महत्त्वाच्या बातम्या
China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?
१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट
एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार
नाणार येणार..? 'सामना'ला जाहिरात, नाणारचे फायदे अन् महत्व सांगितले