आता समृद्धी महामार्गाच्या बाजूने धावणार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 06:05 AM2018-06-04T06:05:11+5:302018-06-04T06:05:11+5:30

बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता याच दोन्ही शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावू शकते. रेल्वे मंत्रालयाने तशी योजना असून, समृद्धी महामार्गासोबतच या बुलेट ट्रेनसाठीही भूसंपादन करण्याचा विचार असून यासाठी स्पेनच्या इन्को या कंपनीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे.

 Mumbai-Nagpur bullet train will now run towards the Samrudhiyya highway | आता समृद्धी महामार्गाच्या बाजूने धावणार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन

आता समृद्धी महामार्गाच्या बाजूने धावणार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन

googlenewsNext

मुंबई : बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता याच दोन्ही शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावू शकते. रेल्वे मंत्रालयाने तशी योजना असून, समृद्धी महामार्गासोबतच या बुलेट ट्रेनसाठीही भूसंपादन करण्याचा विचार असून यासाठी स्पेनच्या इन्को या कंपनीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास दोन वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेसाठी केलेला हा पहिला एकत्रित प्रकल्प ठरेल.
नागपूर-मुंबई वाहतूक कालावधी आठ तासांनी कमी करणारा ‘कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ समृद्धी महामार्ग निर्माण होत आहे. ७१० किमी लांबीच्या या महामार्गाच्या बाजूने ‘बुलेट ट्रेन’ धावू शकते. रेल्वे खाते आणि रस्ते वाहतूक खाते मिळून यासंदर्भात काम करत आहे.

भूसंपादन हाच कळीचा मुद्दा
महामार्गासोबतच बुलेट ट्रेनचा मार्ग उभा करण्यामागे भूसंपादन हा कळीचा मुद्दा आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गिकेसाठी हीच अडचण येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळेच अशाप्रकारच्या प्रकल्पांसाठी एकत्रित भूसंपादन करण्याचा विचार समोर आला. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करतानाच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचाही विचार करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

अशी धावेल बुलेट ट्रेन
बुलेट ट्रेनसाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. मुंबई मेट्रो व दिल्ली-कोलकाता बुलेट ट्रेनसाठीच्या स्पेनच्या इन्को या सल्लागार कंपनीनेच नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा तांत्रिक अभ्यास पूर्ण केला आहे. ही बुलेट ट्रेन बहुतांश भागात पुलावरुन धावेल. इन्को कंपनीने दिलेल्या अहवालावर सध्या रेल्वेच्या अधिकाºयांकडून अभ्यास सुरू आहे.

रेल्वेने जलद प्रवास, रेल्वेने जलद मालवाहतूक, रस्ते मार्गेही जलद प्रवास
नागपूर-मुंबई दरम्यान रेल्वेच्या जलद मालवाहतुकीसाठी ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ हा स्वतंत्र मार्ग उभा होणार आहे. पण त्यामध्ये भूसंपादनाच्या अडचणी येत आहेत.
बुलेट ट्रेनचा मार्ग समृद्धी महामार्गालगतच असल्याने तिथेच हा ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ ही उभा करता येईल का? याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे.
तसे झाल्यास महामार्ग, बुलेट ट्रेन व जलद मालवाहतुकीचा ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ एकाच ठिकाणी असून या तिन्हीसाठीचे भूसंपादन एकत्रच केले जाईल.

Web Title:  Mumbai-Nagpur bullet train will now run towards the Samrudhiyya highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.