Join us  

मुंबई-नागपूर शिवनेरी भाडय़ात कपात

By admin | Published: December 13, 2014 2:08 AM

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान एसटी महामंडळाकडून मुंबई ते नागपूर अशी सेवा सुरू करण्यात आली. मात्र अव्वाच्या सव्वा भाडे असलेल्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली होती.

मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान एसटी महामंडळाकडून मुंबई ते नागपूर अशी सेवा सुरू करण्यात आली. मात्र अव्वाच्या सव्वा भाडे असलेल्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली होती. त्यामुळे प्रवास भाडे कमी करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेत एसटी महामंडळाने भाडय़ात 570 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता यापुढे 1,800 रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे. 
मुंबई-नागपूर मार्गावर 6 डिसेंबर ते 5 जानेवारीर्पयत शिवनेरी एसी सेवा एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू करतानाच प्रत्येक प्रवाशामागे तब्बल 2 हजार 370 रुपये प्रवास भाडे आकारण्यात आले. याच मार्गावर धावणा:या खासगी बसचे भाडे 1,200 ते 1,400 रुपये आकारण्यात येत असल्याने एसटीच्या बसला कमी प्रतिसाद मिळत होता. हे भाडे कमी करा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. महामंडळाच्या फेसबुकवरूनही प्रवाशांनी ही मागणी जोर लावून धरली. त्यामुळे भाडे कमी करण्याचा विचार केला जाईल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले होते. त्यानुसार मुंबई-नागपूर या सेवेच्या प्रवास भाडय़ात 570 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 डिसेंबरपासून या सेवेचे भाडे 1,800 रुपये आकारण्यात येईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. 
 
ही सेवा सुरू करतानाच प्रत्येक प्रवाशामागे  2 हजार 370 रुपये प्रवास भाडे आकारले. याच मार्गावर धावणा:या खासगी बसचे भाडे 1,200 ते 1,400 रुपये आहे.