मुंबईला ५५ हजार स्वच्छतागृहांची गरज

By Admin | Published: November 19, 2014 02:15 AM2014-11-19T02:15:03+5:302014-11-19T02:15:03+5:30

मुंबईत काय मिळत नाही? या मायानगरीत जे हवे ते क्षणात उपलब्ध होते, असे म्हणतात. पण जेव्हा स्वच्छतागृहांचा मुद्दा उपस्थित होतो

Mumbai needs 55 thousand sanitary latrines | मुंबईला ५५ हजार स्वच्छतागृहांची गरज

मुंबईला ५५ हजार स्वच्छतागृहांची गरज

googlenewsNext

पूजा दामले, मुंबई
मुंबईत काय मिळत नाही? या मायानगरीत जे हवे ते क्षणात उपलब्ध होते, असे म्हणतात. पण जेव्हा स्वच्छतागृहांचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा मात्र बरीच शोधाशोध करावी लागते. कारण मुंबईला ६५ हजार स्वच्छतागृहांची गरज असताना शहरात साडेदहा हजारच स्वच्छतागृहे आहेत. तब्बल ५५ हजार स्वच्छतागृहांची उणीव यथे भासत आहे.
मुंबईची लोकसंख्या आणि इथे कामानिमित्त रोज येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण स्वच्छतागृहांची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही. जी स्वच्छतागृहे आहेत ती देखील वापरण्यायोग्य नाहीत. बहुतेक ठिकाणी अस्वच्छताच दिसते. दारे नसणे, कड्या नसणे, फुटलेल्या लाद्या, पाणी नसणे असे प्रकार सर्रास दिसून येतात. नवीन स्वच्छतागृहे बांधायची कुठे हा प्रश्न तर आहेच. मात्र, ती बांधून प्रश्न सुटणार नाही. त्याआधी त्यांची रचना कशी असावी याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. याचबरोबरीने ती स्वच्छतागृहे बांधल्यानंतर तिथे स्वच्छता कशी राहील, नियमांची अंमलबजावणी कशी होईल, यावरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ‘राईट टू पी’च्या कार्यकर्त्या मुमताज शेख यांनी सांगितले.

Web Title: Mumbai needs 55 thousand sanitary latrines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.