केंद्राकडून मुंबईला हवे ७० हजार कोटी
By admin | Published: February 23, 2016 01:06 AM2016-02-23T01:06:54+5:302016-02-23T01:06:54+5:30
केंद्राकडून मुंबईला अधिकाधिक निधी मिळावा, शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, केंद्राच्या मुख्य आणि रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरीता विशेष आर्थिक तरतूदीसाठी शिवसेनेचे
मुंबई : केंद्राकडून मुंबईला अधिकाधिक निधी मिळावा, शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, केंद्राच्या मुख्य आणि रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरीता विशेष आर्थिक तरतूदीसाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारांचा दबावगट तयार केला आहे.
राहुल शेवाळे यांनी यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. यावेळी शेवाळे म्हणाले की, मुंबईत ३५ खासदार वास्तव्य करत आहेत. त्यात लोकसभेचे १६ आणि राज्यसभेचे १९ खासदार आहेत. यांचे पत्ते मुंबईमधील आहेत. या खासदारांचा एक स्वतंत्र दबावगट तयार केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमधील प्रश्नांबाबत या सर्व खासदारांसोबत चर्चा करण्यात आली आहे. ‘मेक इन मुंबई’ या योजनेला योगदान मिळावे, शहरासाठी अधिक निधी मिळण्यासाठी दबावगट तयार करण्यात आल्याचे शेवाळे म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पायाभूत सुविधा आणि बिझिनेस हबसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी या दबावगटाद्वारे पाठपुरवा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.