मुंबईच्या महापौरांचे नवीन निवासस्थान शिवाजी पार्कवरच!; महापालिकेचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 02:56 AM2018-11-22T02:56:53+5:302018-11-22T02:57:13+5:30

विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अखेर भायखळ्यातील राणीच्या बागेतील पालिकेच्या बंगल्यात जाण्याची तयारी दाखविली आहे.

Mumbai new mayor resident at Shivaji Park! The municipal efforts are continuing | मुंबईच्या महापौरांचे नवीन निवासस्थान शिवाजी पार्कवरच!; महापालिकेचे प्रयत्न सुरू

मुंबईच्या महापौरांचे नवीन निवासस्थान शिवाजी पार्कवरच!; महापालिकेचे प्रयत्न सुरू

Next

मुंबई : विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अखेर भायखळ्यातील राणीच्या बागेतील पालिकेच्या बंगल्यात जाण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, मुंबईच्या महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसे महापौर निवासस्थान शिवाजी पार्कवरच बांधण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे. यासाठी पालिकेच्या जिमखान्याची जागा वापरण्यात येणार आहे.
दादर पश्चिम येथील महापौर बंगल्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. मलबार हिल येथील जल अभियंता खात्याचा बंगला महापौर निवास स्थानासाठी मिळविण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, महापौरांनी अखेर राणीच्या बागेतील बंगल्यात जाण्याची तयारी दाखविली. त्यानुसार, शिवाजी पार्कवरील बंगल्याचा ताबा स्मारक समितीला देण्यात आला आहे.
शिवाजी पार्कवर असलेल्या महापालिकेच्या जिमखान्याच्या जागी महापौर निवासस्थान बांधण्यासाठी या जागेचे आरक्षण बदलून महापालिका गृहनिर्माण असे करण्यात आले आहे. विकास नियोजन आराखड्यातूनही हा बदल मंजूर झाला आहे. त्यामुळे महापौर निवासस्थान त्याच जागी उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवाजी पार्कच का?
मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांची भेट घेण्यास देश-परदेशातील शिष्टमंडळ येत असतात, तसेच आपले गाºहाणे मांडण्यासाठी दररोज महापौर बंगल्यावर नागरिकांचीही वर्दळ असते. त्यामुळे मध्यवर्ती व प्रवासाच्या दृष्टीने सोईस्कर ठिकाणी बंगला असणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवाजी पार्कसमोर असलेल्या जुन्या बंगल्याप्रमाणेच नवीन बंगलाही शिवाजी पार्कवरच असणार आहे.

एकही वीट रचू देणार नाही - मनसे
शिवाजी पार्कवरील जिमखान्याची जागा कर्मचाऱ्यांसाठी वापरली गेली पाहिजे. या जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, महापालिकेने आता त्याचे आरक्षण बदलून ‘महापौर निवास’ उभे करण्याचा घाट घातला आहे. मनसे याची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

अशी आहे बंगल्याची जागा
दादर समुद्रकिनाºयाला लागून असलेले महापौर निवासस्थान पुरातन वास्तू आहे. या वास्तूची शानच काही और आहे. ११ हजार ५५१ चौ.मी. जागेत असलेले सध्याचे महापौर निवासस्थान आलिशान राजवाडाच आहे. मात्र, शिवाजी पार्कवर भविष्यात महापौरांचे नवीन निवासस्थान उभे राहिल्यास, ते केवळ ४ हजार ३४५ चौ.मी. जागेवर असणार आहे.

Web Title: Mumbai new mayor resident at Shivaji Park! The municipal efforts are continuing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.