दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 01:13 PM2024-05-04T13:13:32+5:302024-05-04T13:13:48+5:30

Mumbai Crime : मुंबई विमानतळावर २५ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अफगाणिस्तानच्या महिला राजनैतिक अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आलीय.

Mumbai News Afghan diplomat caught smuggling 25 kg gold into India | दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

Mumbai Airport : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. सीमाशुल्क विभागाने ८.३७ कोटी रुपयांचे १२.७४ किलो सोने जप्त केले आहे. एकूण २० प्रकरणांमध्ये हे सोने जप्त करण्यात आले आहे. सोने लपवण्यासाठी तस्करांनी विविध पद्धतीचा वापर केल्याचं समोर आलं आहे. आणखी एका सोने तस्करीच्या प्रकरणात अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकाऱ्याला देखील पकडण्यात आलंय. अफगाणिस्तानच्या महिला अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अलीकडेच अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकारी जनरल झाकिया वारदक यांना मुंबई विमानतळावर पकडलं आणि त्यांच्याकडून १८.६ कोटी रुपयांचे २५ किलो सोने जप्त केले. हे सोने दुबईतून भारतात तस्करी करण्याचा झकियाचा प्रयत्न होता, असा आरोप करण्यात आला. ही घटना २५ एप्रिल रोजी घडली असून सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत जनरल झाकिया वारदक यांच्याविरोधात सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सोने जप्त करण्यात केले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अफगाणिस्तानच्या जनरल झाकिया वारदक दुबईतून भारतात 18.6 कोटी रुपयांचे सोने तस्करी करण्याचा विचारात होत्या. त्यांनी कपड्यात सोन्याचे दागिने लपवले होते. 25 एप्रिल रोजी या महिला अधिकाऱ्याला
विमानतळावर पकडण्यात आले होते. मात्र, त्याची माहिती आता समोर आली आहे. वारदक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोने जप्त करण्यात आले आहे.

कसं सापडलं सोनं?

५८ वर्षीय झाकिया या २५ एप्रिल रोजी संध्याकाळच्या फ्लाइटने आपल्या मुलासह मुंबईला परतल्या होत्या. दोघांनी विमानतळाबाहेर पडण्यासाठी ग्रीन चॅनलचा वापर केला. ग्रीन चॅनल म्हणजे त्यांच्याकडे असा कोणतीही गोष्ट नाही ज्याची सीमाशुल्क विभागाने तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक्झिट गेटवर थांबवले. झाकिया आणि त्यांच्या मुलाकडे ५ ट्रॉली बॅग, एक हँड बॅग, स्लिंग बॅग आणि गळ्यातील उशी होती. राजनैतिक अधिकारी  असल्याने त्यांच्या सामानावर कोणताही टॅग नव्हता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासली असता त्यात सोने आढळून आले नाही. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने झाकिया यांना झडतीसाठी दुसऱ्या खोलीत नेले. तिथे झाकीया यांचे जॅकेट, लेगिंग्ज, नी कॅप आणि बेल्टमध्ये सोने सापडले. त्यात १ किलो वजनाच्या २४ कॅरेट सोन्याच्या २५ बिस्किटांचा समावेश होता. झाकिया यांच्याकडे सोन्याबाबत कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ते जप्त करण्यात आलं.

दुसरीकडे, वारदक यांना राजनैतिक अधिकारी असल्याने अटक करण्यात आलेली नाही. वारदक यांच्याकडे इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानने जारी केलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट होता. कायद्यानुसार, तस्करीच्या सोन्याची किंमत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास संशयितास अटक केली जाते आणि फौजदारी कारवाई केली जाते.

वारदक यांनी दिलं स्पष्टीकरण

"या आरोपांमुळे मी हैराण आणि चिंतित झालो असून या प्रकरणाची अधिक चौकशी होणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की,  दूतावासाला पाठिंबा देण्यासाठी काम करताना मला आलेल्या अलीकडील वैयक्तिक आव्हानांची तुम्हाला जाणीव आहे. मी नुकताच मुंबईबाहेर उपचारासाठी आली आहे," असे जनरल झाकिया वारदक यांनी म्हटलं.
 

Web Title: Mumbai News Afghan diplomat caught smuggling 25 kg gold into India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.