मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 08:10 AM2020-01-18T08:10:09+5:302020-01-18T08:23:58+5:30
आज, उद्या पाणीपुरवठा बंद
मुंबई - जलजोडणीच्या कामानिमित्त धारावी आणि वांद्रे येथील काही परिसरांमध्ये या वीकेंडला पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे १८ आणि १९ जानेवारी रोजी या परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. यासाठी त्यांनी पाणी आदल्या दिवशी भरून ठेवावे व जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याने केले होते.
धारावी येथे १५०० मि.मी. व्यासाची आणि १४५० मि.मी. व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनीच्या जलजोडणीचे काम येत्या शनिवारी हाती घेण्यात येणार आहे. हे काम २४ तास चालणार असल्याने या काळात जी/उत्तर आणि एच /पूर्व विभागांत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता जलजोडणीच्या कामाला सुरुवात करून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद
१८ जानेवारी - जी /उत्तर विभाग - धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए.के.जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड व दिलीप कदम मार्ग.
१९ जानेवारी - जी /उत्तर विभाग - धारावी सकाळचा पाणीपुरवठा - प्रेमनगर, नाईक नगर, ६० फीट रोड, जस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम.जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड.
शनिवार, रविवार - एच /पूर्व विभाग - वांद्रे टर्मिनस परिसर
महत्त्वाच्या बातम्या
‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली
मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?
मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका
जनतेला भवितव्याचा अधिकार; पाकव्याप्त काश्मिरात सार्वमत घेण्यास इम्रान खान तयार पण...