Join us

Mumbai North Central Lok Sabha Result 2024: वर्षा गायकवाडांनी अखेरच्या फेऱ्यांमध्ये मारली बाजी, उज्ज्वल निकमांना पराभवाचा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 21:10 IST

Mumbai North Central Lok Sabha Result 2024 : उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाजपाच्या अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)  यांना जोरदार धक्का दिला आहे.

Mumbai North Central Lok Sabha Result 2024 : उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाजपाच्या अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)  यांना जोरदार धक्का दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी १६ हजार ५१४ मतांनी विजय प्राप्त केला आहे. २०१९ च्या निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना या मतदार संघात तिकीट नाकारलं गेलं होतं. भाजपकडून पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना देण्यात आलं. तर काँग्रेसकडून प्रिया दत्त यांच्याऐवजी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. 

मतमोजणीत सुरुवातीच्या १० टप्प्यांमध्ये उज्ज्वल निकम आघाडीवर होते. निकम यांच्याकडे ५० हजारांहून अधिक मतांनी पुढे होते. शेवटच्या काही टप्प्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी भक्कम आघाडी घेत निकम यांना मागे टाकलं आणि अखेरीस विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

वर्षा गायकवाड यांना एकूण ४ लाख ४५ हजार ५४५ मतं मिळाली आहेत. तर उज्ज्वल निकम ४ लाख २९ हजार ०३१ मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत. वंचितच्या संतोष आंबुलगे यांनी ८ हजार २८८ मतं घेतली आहेत.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४ निकालवर्षा गायकवाडमुंबई उत्तर मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४