Mumbai North East Lok Sabha Result 2024: ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:49 PM2024-06-04T17:49:48+5:302024-06-04T17:51:59+5:30

Mumbai North East Lok Sabha Result 2024 : दोन्ही उमेदवारांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. अखेरीस संजय दिना पाटील वरचढ ठरले.

mumbai north east lok sabha result 2024 sanjay dina patil won against bjp mihir kotecha maharashtra live result | Mumbai North East Lok Sabha Result 2024: ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत

Mumbai North East Lok Sabha Result 2024: ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत

Mumbai North East Lok Sabha Result 2024 : ईशान्य मुंबईतील अटीतटीच्या लढाईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dine Patil) यांनी विजय प्राप्त केला आहे. भाजपाच्या मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांचा पाटील यांनी २९ हजार १५ मतांनी पराभव केला आहे. याच मतदार संघात निवडणूक काळात बरेच वाद आणि राडे झालेले पाहायला मिळाले होते. दोन्ही उमेदवारांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. अखेरीस संजय दिना पाटील वरचढ ठरले.

संजय दिना पाटील यांना एकूण ४ लाख  ४८ हजार ६०४ मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांच्या पारड्यात ४ लाख १९ हजार ५८९ मतं पडली आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली. १० व्या फेरीनंतर संजय दिना पाटील यांच्या आघाडीत कमालीची वाढ झाली ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. 

संजय दिना पाटील यांच्या विजयानंतर मतदार संघात कार्यकर्ते जोरदार जल्लोष साजरा करत आहेत. एकमेकांना लाडू भरवत कार्यकर्ते विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत. २०१९ मध्ये याच मतदार संघातून भाजपाचे मनोज कोटक विजयी झाले होते. तर २०१४ मध्ये किरीट सोमय्या विजयी झाले होते. गेली दोन टर्म भाजपाच्या पारड्यात असलेला मतदार संघ यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. 

Web Title: mumbai north east lok sabha result 2024 sanjay dina patil won against bjp mihir kotecha maharashtra live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.