Join us  

Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 7:45 PM

Mumbai North Lok Sabha Result 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचा गड राखण्यात भाजपाला यश आलं आहे. पीयूष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याविरोधात निर्णायक आघाडी घेतली आहे.

Mumbai North Lok Sabha Result 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचा गड राखण्यात भाजपाला यश आलं आहे. पीयूष गोयल (Piyush Goyal)  यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याविरोधात निर्णायक आघाडी घेतली आहे. तब्बल साडेतीन लाखांहून अधिक मतांनी पीयूष गोयल पुढे आहेत आणि शेवटच्या काही फेऱ्यांची मतमोजणी होणं बाकी आहे. गोयल यांची आघाडी पाहता विजयाची घोषणा फक्त औपचारिकता राहिली आहे. 

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पीयूष गोयल यांना ६ लाख ७३ हजार ८२८ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्या पारड्यात ३ लाख २० हजार ५७२ मतं मिळाली आहेत. उत्तर मुंबई मतदार संघातून २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी विजय प्राप्त केला होता. २०१९ मध्ये गोपाळ शेट्टी यांनी तब्बल साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजय प्राप्त केला होता. त्यामुळे भाजपासाठी हा पोषक मतदार संघ असल्यानं केंद्रीय मंत्री राहिलेल्या पीयूष गोयल यांना याठिकाणाहून यंदा उमेदवारी देण्यात आली. 

पीयूष गोयल यांनी विजय प्राप्त केला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला मिळालेलं मताधिक्य कमी झालं आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच पीयूष गोयल यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४ निकालमुंबई उत्तरपीयुष गोयलमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४