मुंबई : लक्षात ठेवा, राज ठाकरे यांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे, या शब्दांत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महायुतीला सुनावले आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून संजय निरुपम यांच्यासह रवींद्र वायकर यांच्या संभाव्य उमेदवारीला आमचा तीव्र विराेध असेल, असे त्या म्हणाल्या. ठाकरे पुढे म्हणाल्या, मनसेला शिंदेसेनेच्या चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. संजय निरुपम यांना महाराष्ट्रद्रोही म्हणताना ते इकडून तिकडून पाला पाचोळ्यासारखे उडत आले त्याचे काय, असा सवाल करत त्यांनी रविंद्र वायकर यांना भ्रष्टाचारी म्हटले. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण काही उमेदवारांना मनसेचा विरोध आहे. तुमच्याकडे उमेदवार नाहीत आणि आमच्या पक्षालाही पुढे येऊ देत नाही, असेही त्या म्हणाल्या.