Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:50 PM2024-06-04T16:50:14+5:302024-06-04T20:09:22+5:30

Mumbai North West Lok Sabha Result 2024 : महाराष्ट्रातील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून सुनील दत्त, प्रिया दत्त, राम जेठमलानी अशी मोठी नावं लोकसभेत पोहोचली आहेत. परंतु यावेळी या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली होती.

Mumbai North West Lok Sabha Election Result 2024 shiv sena ubt Amol Kirtikar lost ravindra waikar won battle after recounting | Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले

Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले

Mumbai North West Lok Sabha Result 2024 : महाराष्ट्रातील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा व्हीआयपी जागांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी सुनील दत्त, प्रिया दत्त, राम जेठमलानी अशी मोठी नावं या मतदारसंघातून लोकसभेत पोहोचली आहेत. दरम्यान, यावेळी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठानं विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, या निवडणुकीत रवींद्र वायकर यांनी  ४८ मतांनी विजय मिळवला. 
 

यापूर्वी अमोल कीर्तिकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली होती. नंतर रवींद्र वायकर यांनी फेरमतदानाची मागणी केल्याचं समोर आलं. दरम्यान, एकूण ९५४९३३९ मतदान मोजणी झाली. यात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना ४५२६४४ मतं मिळाली. तर शिवसेना उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ४५२५९६ मतं मिळाली. फेर मतमोजणीत वायकर हे ४८ मतांनी विजयी झाल्याचं उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी घोषित केलं.
 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती
 

गोरेगाव नेस्को ग्राउंडच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची गर्दी जमू लागली आहे. त्यानी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करायला ही सुरुवात केली आहे. या ठिकाणची गर्दी वाढीस लागल्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मतमोजणीच्या वेळी झालेल्या गोंधळाबाबत जसजसे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यायांना समजत आहे तसतसं त्यांनी नेस्को ग्राउंडच्या जवळ त्यांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त अधिक  बंदोबस्त कडक केला आहे. परिमंडळ १२ मधील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत. तसेच साध्या वेशातील पोलिसही गर्दीला पांगवण्याचा तसेच त्यांचे संबंध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 

निवडणुकीपूर्वीची स्थिती
 

लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, पण नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील इतर जागांप्रमाणेच येथेही २० मे रोजी मतदान झाले. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ५८.८४ टक्के मतदान झालं होतं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात होते.
 

शिवसेनेनं (उबाठा) जेव्हा या जागेसाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली होती तेव्हा, काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ही जागा शिवसेना उबाठाला गेल्यानंतर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला होता. त्यानंतर शिवसेनेनं प्रदीर्घ संघर्षानंतर रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. यापूर्वी या मतदारसंघातून अभिनेता गोविंदा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. 

Web Title: Mumbai North West Lok Sabha Election Result 2024 shiv sena ubt Amol Kirtikar lost ravindra waikar won battle after recounting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.