Mumbai North West Lok Sabha Result 2024: काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:26 PM2024-06-04T12:26:17+5:302024-06-04T12:29:40+5:30
Mumbai North West Lok Sabha Result 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) सध्या आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Mumbai North West Lok Sabha Result 2024 : मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत असून सध्या काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) सध्या आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उत्तर-पश्चिम मतदार संघातील आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार अमोल कीर्तिकर यांना १ लाख ४४ हजार १६४ मतं मिळाली आहेत. तर वायकर यांना १ लाख ४३ हजार ८१५ मतं आहेत. कीर्तिकर यांच्याकडे अवघ्या ३४९ मतांची आघाडी आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनुसार दोन्ही उमेदवारांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील या मतदार संघातील लढत अत्यंच चुरशीची झाली आहे. सरतेशेवटी कोण बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
उत्तर-पश्चिम मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी सलग दोन टर्म खासदारकी भूषवली आहे. राज्यातील राजकीय फाटाफूटीनंतर गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेले. पण त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. उद्धव ठाकरे गटानं अमोल कीर्तिकर यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहिर केली. तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली. रवींद्र हे राज्यात मंत्रीपद देखील भूषवलं आहे. जोगेश्वरी विधानसभेत त्यांची चांगली पकड आहे. दोन्ही उमेदवार तगडे असल्याची प्रचिती आता मतमोजणीतही दिसून येत आहे.