मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या भायखळा येथील सर जे. जे. समूह रुग्णलयात गरोदर महिलांची सोनोग्राफी मोफत केली जाते. विशेष म्हणजे या रुग्णालयाअंतर्गत कामा रुग्णालय विशेष करून महिला आणि मुलांच्या उपचाराकरिता स्वतंत्र रुग्णालय आहे. त्या ठिकणी बहुतांश गरोदर महिला उपचारासाठी येतात. या महिलांना सोनोग्राफीची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे; तसेच बहुतांश सर्वच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयात जननी सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. त्या योजनेअंतर्गत गरोदर महिलांच्या सर्व तपासण्या आणि बाळाची प्रसूती मोफत केली जाते.
या ठिकाणी मोफत सोनोग्राफी मुंबई महापालिकेच्या आणि सरकारी सर्व रुग्णालयांत स्त्रीरोग विभागात ही सोनोग्राफी मोफत केली जाते. विशेष म्हणजे केंद्र सरकारने माता आणि बाल मृत्युदर कमी करण्यासाठी जननी सुरक्षा योजना संपूर्ण देशात सुरू केली आहे. या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांच्या सर्व तपासण्या आणि बाळाची प्रसूती मोफत केली जाते.
२,८५७ जणींनी घेतला लाभगेल्या तीन महिन्यांत कामा रुग्णालयात २,८५७ गरोदर महिलांनी मोफत सोनोग्राफीचा लाभ घेतला आहे.
सोनोग्राफी का करावी लागते?गरोदर महिलांच्या पोटातील बाळाची तब्येत कशी, हे पाहण्यासाठी सोनोग्राफीची गरज लागते. त्या चाचणीच्या उपचारानंतर डॉक्टर काही गरज असल्यास उपचाराची दिशा ठरवितात. गरोदरपणाव्यतिरिक्तही महिलांचे काही आजार असतात. कुणाच्या पोटात दुखत असते. मूत्रमार्गातील संसर्गाचा आजार असल्यास, पोटात फायब्रॉईडच्या गाठी या आणि अशा विविध कारणांसाठी सोनोग्राफी केली जाते.
इतरांना १०० रुपयेसरकारी रुग्णालयात गरोदर महिलांना सोनोग्राफी मोफत असून, इतर महिला ज्या वेगळ्या आजारासाठी सोनोग्राफी करण्याकरिता येतात त्यांच्याकडून १२० रुपये शुल्क आकारले जाते. तर खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी १५०० ते २००० रुपये इतका दर आकाराला जातो.
कधी करावी सोनोग्राफी?गरदोरपणात सर्वसाधारणपणे चारवेळा सोनोग्राफी केली जाते. वैद्यकीय तज्ज्ञ परिस्थिती बघून निर्णय घेतात. गर्भधारणा झाली आहे की नाही, ही चाचणी केल्यानंतर जर चाचणी पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळी सोनग्राफी केली जाते; तसेच गरोदरपणाच्या काळात अडीच महिने, पाच महिने आणि नवव्या महिन्यांत सोनोग्राफी केली जाते.
कामा रुग्णलयात आता २४ तास सोनोग्राफीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन विभागात कुणी महिला आल्यास आणि सोनोग्राफीची गरज लागल्यास ही सेवा अविरतपणे सुरु ठेवली आहे. गरोदरपणाच्या काळात चारवेळा सोनोग्राफी करण्यास सांगितले जाते. गरोदर महिलांना सर्व सोयी मोफत आहेत. - डॉ. तुषार पालवे, स्त्री रोगतज्ज्ञ, अधीक्षक, कामा रुग्णालय