मुंबईत काेराेनाचे रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वेगाने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:57+5:302021-03-15T04:06:57+5:30
मुंबई : मुंबईत काेराेनाचे रुग्ण दुप्पट हाेण्याचा कालावधी शनिवारच्या तुलनेत दहा दिवसांनी कमी झाला आहे. दररोज १०-१२ दिवसांनी कमी ...
मुंबई : मुंबईत काेराेनाचे रुग्ण दुप्पट हाेण्याचा कालावधी शनिवारच्या तुलनेत दहा दिवसांनी कमी झाला आहे. दररोज १०-१२ दिवसांनी कमी होणारा हा काळ संसर्गवाढीच्या दृष्टीने नवे आव्हान घेऊन येणारा असल्याने चिंतेचे वातावरण वाढत आहे.
रविवारी १ हजार २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख १७ हजार ५७९ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या १३ हजार ९४० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १७६ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३१ चाळी व झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर २२० इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३५ लाख ५८ हजार ३५९ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण दुपटीचा कालावधी
दिनांक दिवस
१४ मार्च १७६
१३ मार्च १८६
१२ मार्च १९६
११ मार्च २०५
१० मार्च २१५
सक्रिय रुग्णांत झालेली वाढ
१४ मार्च १३,९४०
१३ मार्च १३,२४७
१२ मार्च १२,४८७
११ मार्च ११,९६९
१० मार्च ११,५११