लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत रविवारी कोरोनाबाधित १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५५ नोंदविण्यात आली आहे, तर कोरोनामधून ६६६ रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या शून्य आहे.
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १२ जणांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ११ पुरुष रुग्ण होते, तर ४ महिला होत्या. ३ रुग्ण ४० वर्षांखालील होते. १० रुग्ण ६० वर्षांवरील होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटांतील होते. मुंबईत ३४ हजार ९८० चाचण्या करण्यात आल्या असून, बरे झालेल्या रुग्णांचा प्रमाण ९६ टक्के आहे. ४ ते १० जुलैदरम्यान कोविड वाढीचा दर ०.०७ टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा दर ९२८ दिवस आहे. सक्रिय कंटेनमेंट झोन ५ असून, सक्रिय सीलबंद इमारती ६८ आहेत.