अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात तब्बल ६७,७०१ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर तब्बल ५,६४७ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे जरी आज राज्यात २९०० कोरोना बाधीत असले तरी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये असणारे हे रुग्ण बरे होऊन घरी जात नाहीत आणि नवीन रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सगळ्या यंत्रणांवरील ताण कायम आहे.
राज्यातील गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये नाही. राज्यात सर्वात जास्त होम क्वारंटाइनमध्ये मुंबईच्या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे तब्बल ४०,९११ रुग्ण आहेत. त्या खालोखाल पुणे ७९६१, अमरावती ३८०४, रत्नागिरी २५७९, ठाणे २३४१, औरंगाबाद १६४१, नागपूर ११९०, सोलापूर १०३३ हे जिल्हे आहेत. नऊ जिल्हे हजारामध्ये आहेत.त्यानंतर सांगली ९८५, सातारा ८७६, लातूर ४८८, अहमदनगर ४३७, सिंधूदूर्ग ४०३, पालघर ३७२, रायगड ३२९, उस्मानाबाद ३६२, नाशिक ३२०, जळगाव ३११, बीड २१५, धुळे १४९, जालना २२७, बुलडाणा १३३, परभणी १२२ हे १५ जिल्हे तीन आकडी संख्येत आहेत. तर वाशिम ८९, अकोला ६८, भंडारा ३२, नंदुरबाद १८, हिंगोली १० हे पाच जिल्हे दोन आकडे रुग्णंख्येत आहेत. तसेच गडचिरोली ८, कोल्हापूर ४ तर चंद्रपूर १ अशा या तीन जिल्ह्यात एक आकडी रुग्ण आहेत.रुग्णालयात क्वारंटाइन केलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक १०२९ एवढे रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्या खालोखाल नागपूर ५९२, अहमदनगर ४९९, ठाणे ४६०, पुणे ४४२, मुंबई (दोन जिल्हे) ४२१, सातारा २७८, नाशिक २६८, सोलापूर २६७, रत्नागिरी १८८ व नांदेड १२० असे एकूण ११ जिल्हे तीन आकडी आहेत. त्यानंतर लातूर ९७, यवतमाळ ९६, बीड ९५, जालना ९०, सांगली ८२, उस्मानाबाद ८०, गोंदिया ७५, औरंगाबाद ७६, पालघर ६७, परभणी ५५, चंद्रपूर ४८, सिंधूदूर्ग ४६, नंदूरबार ४६, बुलडाणा ३१, अकोला २६, वाशिम १७, रायगड १४, जळगाव १२, हिंगोली १० या १९ जिल्ह्यांमध्ये दोन आकड्यांमध्ये रुग्ण आहेत. तर भंडारा ७ व गडचिरोली १ असे दोन जिल्ह्यात एक आकड्यात रुग्ण दाखल आहेत.