Join us

मुंबईत रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत १० हजारांच्या उंबरठ्यावर गेलेली रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट ...

मुंबई : मुंबईत १० हजारांच्या उंबरठ्यावर गेलेली रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली. मुंबईत रविवारी २ हजार ४०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. काल, शनिवारी ही संख्या २६ हजारांहून अधिक होती. रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

मुंबईतील आजही कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात ३ हजार ३७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ६ लाख १३ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९१ टक्के झाला आहे. मुंबईत दिवसभरात ३२ हजार ५९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील २ हजार ४०३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

मुंबईत २ मे ते ८ मे पर्यंत विचार केला असता मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.४४ टक्के इतका आहे. मुंबईत ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ६ लाख ७६ हजार ४७५ बाधित रुग्णांपैकी १३ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ८९ सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत. काल, शनिवारी हीच संख्या ९३ इतकी होती, तर ५५३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.