Mumbai: नवरात्रोत्सव निमित्त मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात “जागर योजनांचा

By मनोहर कुंभेजकर | Published: October 19, 2023 06:03 PM2023-10-19T18:03:39+5:302023-10-19T18:04:08+5:30

Mumbai: ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियानात समन्वयकाच्या भूमिकेत असणाऱ्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात नवरात्रोत्सव निमित्त “जागर योजनांचा, महिलांच्या सशक्तीकरणाचा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Mumbai: On the occasion of Navratri Festival, Chief Minister's Public Welfare Chamber of "Jagar Yojana". | Mumbai: नवरात्रोत्सव निमित्त मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात “जागर योजनांचा

Mumbai: नवरात्रोत्सव निमित्त मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात “जागर योजनांचा

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - राज्यातील दोन कोटी महिलांना शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियानात समन्वयकाच्या भूमिकेत असणाऱ्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात नवरात्रोत्सव निमित्त “जागर योजनांचा, महिलांच्या सशक्तीकरणाचा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महिलांचे सक्षमीकरण किंवा महिला बचत गट हि संकल्पना केवळ कागदोपत्री न ठेवता आणि विशेषतः महिलांना केवळ ‘बचत’ या संकुचित शब्दात अडकून न ठेवता २१ व्या शतकातील आपल्या महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या पुढे ‘शक्ती’ म्हणून काम करत आहेत, त्यामुळे त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे, राज्यातील प्रत्येक महिलेला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्यसरकार व लोकसहभागातून राज्यव्यापी प्रयत्न करत १ कोटी महिलांना थेट शासकीय योजनांचा लाभ देणे, किमान १ कोटी महिलांना शक्ती गटाशी जोडणे, १० लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देणे, ५ लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि १० लाख महिला उद्योजिकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध होण्यासाठी व्यवस्था उभी करण्याचे राज्यव्यापी ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ हे अभियान भव्य स्वरुपात राबविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निर्धार असून हे अभियान राज्यभर राबविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाला देण्यात आली आहे.

Web Title: Mumbai: On the occasion of Navratri Festival, Chief Minister's Public Welfare Chamber of "Jagar Yojana".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.