मुंबई केंद्रातून ‘प्यादी’ अव्वल!

By admin | Published: December 6, 2014 11:31 PM2014-12-06T23:31:49+5:302014-12-06T23:31:49+5:30

54 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत मुंबई केंद्रातून विघ्नहर्ता सेवा संघ, मुंबई या संस्थेचे ‘प्यादी’ हे नाटक अव्वल ठरले.

Mumbai 'Paddy' from the center! | मुंबई केंद्रातून ‘प्यादी’ अव्वल!

मुंबई केंद्रातून ‘प्यादी’ अव्वल!

Next
मुंबई : 54 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत मुंबई केंद्रातून विघ्नहर्ता सेवा संघ, मुंबई या संस्थेचे ‘प्यादी’ हे नाटक अव्वल ठरले. या नाटकाला 2क् हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. ‘प्यादी’ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. 
मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमी, मुंबई या संस्थेच्या ‘मेलो डोळो मारून गेलो’ नाटकास 15 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लब, माझगाव या संस्थेच्या ‘देखवे ना डोळा’ नाटकाला 1क् हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
17 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, 2क्14 या कालावधीत रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे अतिशय जल्लोषात या स्पर्धेत एकूण 16 नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वसंत दातार, महेंद्र सुके आणि देवेंद्र बोंद्रे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
 
च्दिग्दर्शन -
प्रथम पारितोषिक : 1क् हजार रुपये - एस. विशाल (नाटक - प्यादी)
द्वितीय पारितोषिक : 5 हजार रुपये - सुलेखा दोशी ( नाटक - मेलो डोळो मारून गेलो)
च्नेपथ्य -
प्रथम पारितोषिक, 5 हजार रुपये - महेश केरकर - (नाटक - देखवे ना डोळा)
द्वितीय पारितोषिक, 3 हजार रुपये - प्रदीप पाटील - (नाटक - गाणं पंचरंगी पोपटाचं)
च्प्रकाशयोजना -
प्रथम पारितोषिक, 5 हजार रुपये - संजय विनायक (नाटक - प्यादी)
द्वितीय पारितोषिक, 3 हजार रुपये - चेतन पडवळ (नाटक  - मेलो डोळो मारून गेलो)
 
च्रंगभूषा -
प्रथम पारितोषिक, 5 हजार रुपये - मिलिंद कोचरेकर (नाटक - महाभारत बिटवीन द लाइन)
द्वितीय पारितोषिक, 3 हजार रुपये - उल्हेश खंदारे (नाटक - भेटी लागे जिवा)
च्उत्कृष्ट अभिनय : 
रौप्यपदक व 3 हजार रुपये : सुनील वालावलकर (नाटक- देखवे ना डोळा) व वैशाली जाधव (नाटक - प्यादी)

 

Web Title: Mumbai 'Paddy' from the center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.