मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:01 AM2022-12-27T10:01:42+5:302022-12-27T10:02:56+5:30
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने हंगामी तत्त्वावर सुरू केलेल्या मुंबई-गोवा शिवशाहीला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने हंगामी तत्त्वावर सुरू केलेल्या मुंबई-गोवा शिवशाहीला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून, दोन दिवसांत ९४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच केवळ दहा दिवस चालविण्यात येणाऱ्या शिवशाहीच्या सर्व सीट फुल्ल झाल्या आहेत. या उपक्रमामुळे पहिल्या दोन दिवशी अनुक्रमे ५० आणि ४४ हजार रुपये इतके उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर नागरिक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहे.
पर्यटकांची गोवा आणि कोकणला सर्वाधिक पसंती आहे. सध्या गोवा आणि कोकणात जाण्यासाठी खासगी ट्रव्हल्सचे तिकीट दर तीन हजारांच्या घरात पोहोचले आहे, तर ट्रेनदेखील फुल्ल झाल्या आहेत. एसटी महामंडळाने हीच गर्दी एसटीकडे वळविण्यासाठी २३ डिसेंबरपासून मुंबई सेंट्रल ते गोवा मार्गावर शिवशाही (४३ सीटर) सुरू केली. शिवशाहीचे तिकीट दर १ हजार २४५ रुपये आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"