Mumbai Plane Crash :... तर घाटकोपरचा विमान अपघात टळला असता!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:17 AM2018-07-05T06:17:59+5:302018-07-05T06:17:59+5:30

घाटकोपर विमान दुर्घटना ही हत्या असल्याचा आरोप अ‍ॅड. यशवंत शेनॉय यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai Plane Crash: ... if Ghatkopar plane avoided the accident! | Mumbai Plane Crash :... तर घाटकोपरचा विमान अपघात टळला असता!

Mumbai Plane Crash :... तर घाटकोपरचा विमान अपघात टळला असता!

googlenewsNext

मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटना ही हत्या असल्याचा आरोप अ‍ॅड. यशवंत शेनॉय यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्घटनाग्रस्त विमान सुस्थितीत नसतानाही उड्डाणाला परवानगी देणाऱ्या सर्वच यंत्रणांसह, देखभाल करणा-या कंपनीच्या सीबीआय चौकशीची मागणीही शेनॉय यांनी केली आहे. याआधीच मुंबईतील हवाई वाहतुकीसंदर्भात विमान प्राधिकरणापासून केंद्रीय मंत्रालयासह सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्याची वेळीच दखल घेतली नसल्याने, पाच हकनाक जीव गमवावे लागल्याचे शेनॉय यांनी सांगितले.
शेनॉय म्हणाले की, १२ एप्रिल २०१६ रोजी सहार पोलीस ठाण्यासह पोलीस आयुक्त, मॅजिस्ट्रेट, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांसह लोकायुक्तांनाही हवाई वाहतुकींमधील त्रुटींबाबत सविस्तर तक्रार केली होती. एका तरी यंत्रणेने त्याची वेळीच दखल घेतली असती, तर कदाचित घाटकोपर विमान दुर्घटना टाळता आली असती. मुळात ही दुर्घटना नसून देखभाल करणाºया आणि उड्डाण भरणाºया कंपन्यांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे, तसेच ही स्थानिक घटना नसून, त्याचा संबंध नागरी हवाई वाहतुकीच्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत आहे. म्हणूनच दुर्घटनेची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची गरज आहे, तसेच विमान वाहतुकीशी संबंधित यंत्रणांमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणीही शेनॉय यांनी केली आहे.
शेनॉय यांनी या प्रकरणी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही सांगितले. मुळात ही दुर्घटना म्हणजे एक इशारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केवळ ७ हजार लीटर इंधन क्षमता असलेले विमान कोसळल्याने एका पादचाºयाचा जिवंत जळून मृत्यू झाला. याच ठिकाणी अमेरिकेसाठी उड्डाण भरणारे २ लाख लीटर इंधन क्षमतेचे प्रवासी विमान असते, तर सुमारे २५ हजार लोकांना जीव गमवावा लागला असता.
धक्कादायक बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार विमानतळ परिसरापासून २० किमी अंतरांपर्यंत ४५ मीटरहून उंच इमारती नसाव्यात. तरीही विकासकांशी असलेल्या लागेबांध्यामुळे येथील प्रशासनांनी १०० मीटरहून उंच इमारतींना विमानतळानजीक परवानग्या दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी विमान दुर्घटना मुंबईत घडू शकते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Mumbai Plane Crash: ... if Ghatkopar plane avoided the accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.