Join us

मुंबई पोलिसांची कारवाई; दारु, अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्र जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 5:31 PM

मुंबईमध्ये शनिवारी (६ एप्रिल) पोलीस विभागाच्या पथकाद्वारे ४१ लिटर दारु, दीड किलो गांजा तसेच १ चाकू, २ कट्टे, १ कारटेज जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुंबईमध्ये पोलीस विभागाच्या पथकाद्वारे ४१ लिटर दारु, दीड किलो गांजा तसेच १ चाकू, २ कट्टे, १ कारटेज जप्त करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अमली पदार्थ विरोधी कारवाईत १ किलो ५०० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली.

मुंबई - मुंबईमध्ये शनिवारी (६ एप्रिल) पोलीस विभागाच्या पथकाद्वारे ४१ लिटर दारु, दीड किलो गांजा तसेच १ चाकू, २ कट्टे, १ कारटेज जप्त करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा समन्वय अधिकारी, निवडणुक कक्ष, पोलीस आयुक्त कार्यालयाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल सकाळी ६ वाजेपासुन ते ७ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४१ लिटर ३० मि.ली दारु जप्त करण्यात आली असुन याची किंमत  १२,०५४ रुपये आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थ विरोधी कारवाईत १ किलो ५०० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत १२,५०० रुपये आहे. तसेच अवैध शस्त्रासंबंधी कारवाईत १ चाकू, २ कट्टे, १ कारटेजसह ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, याची किंमत २१,००० रुपये असून उपरोक्त ३ ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांकडुन प्राप्त अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबईपोलिस