सट्टेबाजांवर धाड टाकायला गेले मुंबई पोलीस; खोलीत उपनिरिक्षकाला पाहून धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 09:46 PM2019-06-26T21:46:34+5:302019-06-26T22:04:48+5:30
मंगळवारी ऑस्ट्रेलिया- इग्लंडदरम्यान विश्वचषकाची मॅच सुरु होती.
मुंबई : नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्ल्डकप सामन्यांमध्ये सट्टेबाजीला उत आला आहे. नुकत्याच मुंबईतील एका हॉटेलवर कारवाई करून सट्टेबाजांना पकडलेले असताना माहिममध्ये आणखी एका टोळक्यावर कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस जेव्हा धाड टाकायला गेले तेव्हा त्यांना पोलीस उपनिरिक्षकच सट्टा घेताना आढळला आहे.
मंगळवारी ऑस्ट्रेलिया- इग्लंडदरम्यान विश्वचषकाची मॅच सुरु होती. यावेळी दादर रेल्वे स्थानकाच्या समेरील रामी गेस्ट लाईन हॉटेलमध्ये सट्टेबाज असल्याची खबर पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या धाडीवेळी सट्टेबाजांच्या खोलीमध्ये पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर खरमाटे (34) हा देखील होता. पोलिसांनी खरमाटेविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. खरमाटे हा भायखळा पोलीस ठाण्यामध्ये नियुक्तीवर आहे.
या धाडीमध्ये मिखिन शाह आणि अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले असून माटुंगा पोलीस ठाण्यात खरमटेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खरमटे सट्टेबाजांच्या खोलीत काय करत होता, त्याचा या गुन्ह्यात सहभाग होता की नाही, याची चौकशी सुरू करण्यात आली असून खरमटेला निलंबित करण्यात आले आहे.
#Mumbai: A cricket betting case has been registered at Matunga PS against 3 persons and a police personnel. The police personnel has been suspended and an inquiry has been initiated.
— ANI (@ANI) June 26, 2019
या धाडीमध्ये 1.93 लाख रुपये किंमतीचे 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या सर्वांना कुर्ला येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.