दाऊद शेखचा तीन दिवस पोलिसांना गुंगारा, मोबाईल होता बंद; एका पुराव्याने पोलिसांनी कर्नाटकात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:08 AM2024-07-30T11:08:16+5:302024-07-30T11:20:04+5:30

Mumbai Crime : उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Police arrested Yashshree Shinde murder accused Dawood Sheikh from Karnataka from mobile location | दाऊद शेखचा तीन दिवस पोलिसांना गुंगारा, मोबाईल होता बंद; एका पुराव्याने पोलिसांनी कर्नाटकात पकडले

दाऊद शेखचा तीन दिवस पोलिसांना गुंगारा, मोबाईल होता बंद; एका पुराव्याने पोलिसांनी कर्नाटकात पकडले

 Mumbai Crime ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापूर्वी उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपात एका मुलीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्री शिंदे हिचा असल्याचा खुलासा झाला, या प्रकरणी आता आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतले आहे. २५ जुलैपासून दाऊद शेख फरार झाला होता. तो उरण येथूनच फरार झाला होता, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ६ ते ७ पथके तयार केली होती. 

तांत्रिक पुराव्यामुळे पोलिसांनी कर्नाटक गाठले

२५ जुलै रोजी आरोपी दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या केली. या हत्येनंतर त्याने यशश्रीचा मोबाईल फोन बंद केला आणि रात्रीच मुंबईतून फरार झाला. त्याचा फोन कर्नाटकात गेल्यानंतर बंद झाला. या एकाच तांत्रिक पुराव्याने मुंबई पोलिसांच्या पथकाने कर्नाटक गाठले. नवी मुंबई पोलिसांच्या पथकाला दाऊदच्या मोबाईलचे शेवटचे ट्रॅक कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे सापडले. पोलिसांनी आधीच दाऊदच्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. या चौकशीत दाऊद शेख केरळला पाळून जाणार असल्याची माहिती उघड झाली होती. 

यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद कर्नाटकात लपलेला; गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या

नवी मुंबई पोलिसांनी थेट कर्नाटकातील गुलबर्गा गाठले, तेथील शाहपूर येथून दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिस आज या आरोपीला मुंबईत घेऊन येणार आहेत. त्याच्या चौकशीत अनेक खुलासे होणार आहेत. या हत्येमागे नेमके कारण काय होते? हेत्येत आणखी कोण सहभागी होतं का? या सर्वांची माहिती चौकशीत मिळणार आहे. 

गुरुवारी झाली हत्या

उरण येथे राहणाऱ्या २० वर्षीय यशश्री शिंदे गुरुवारी बेपत्ता झाली होती. तिचा शोध पोलिसांकडून सुरू होताच त्यातच शुक्रवारी रात्री उशीरा एका पेट्रोल पंपाजवळील निर्जनस्थळी युवतीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्रीचा असल्याचं निष्पन्न झालं. या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करणारे डॉक्टरही तिची अवस्था पाहून हादरले. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी जखम होती. शरीरावर अनेक वार केले होते. तिचा निर्घृण खून केल्याचं उघड झालं.

या घटनेत दाऊद शेख नावाच्या आरोपीची ओळख पटली होती.  त्याने यशश्रीवर लैंगिक अत्याचार केले होते. वयाच्या १५ व्या वर्षी यशश्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला पॉक्सो अंतर्गत जेल झाली होती. जेलमधून बाहेर येऊन त्याने यशश्रीसोबत जे केले ते ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल. यशश्री शिंदे कॉमर्सचं शिक्षण घेत होती. शिक्षणासह ती खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करायची. गुरुवारी ती आई वडिलांना बाहेर जाते सांगून घरातून निघाली आणि तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. रात्री उशीरापर्यंत मुलगी परतली नाही तेव्हा वडिलांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.

Web Title: Mumbai Police arrested Yashshree Shinde murder accused Dawood Sheikh from Karnataka from mobile location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.