Join us

Mumbai: मुंबईत हायअलर्ट! दहशतवादी हल्ला, VVIP व्यक्ती होऊ शकतात लक्ष्य; ड्रोन वापरावर महिनाभर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:17 IST

Mumbai on High Alert: मुंबई पोलिसांनी याबाबतच परिपत्रकच जारी केलं आहे. ही बंदी उद्या ४ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. जी पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत राहील. 

Mumbai High Alert: मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतच परिपत्रकच जारी केलं आहे. ही बंदी उद्या ४ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. जी पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत राहील. 

पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनचा वापर करुन दहशतवादी हल्ला तसंच शहरातील VVIP व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी करू शकतात. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. शहरातील गर्दीची ठिकाणं देखील लक्ष्य केली जाऊ शकतात. याच अनुषंगाने पोलिसांनी या सर्व प्रकारच्या ड्रोन वापरावर बंदी घातली आहे. 

उल्लंघन झाल्यास होईल कारवाईमुंबई पोलिसांचे अधिकार क्षेत्र आणि डीसीपीच्या परवानगीविना ड्रोन, रिमोट कंट्रोल ऑपरेटेड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर वापरला गेल्यास कडक कारवाई केली जाईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे. 

बिश्नोई गँगच्या ५ सदस्यांना अटकनुकतंच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं मुंबईच्या अंधेरी परिसरातून कुख्यात गुंड बिश्नोई गँगच्या पाच सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ पिस्तुलं, २१ काडतुसं, एक इंटरनेट डोंगल आणि एक मोबाइल सीमकार्ड जप्त करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्यांचा मुंबईतील एका उद्योगपती आणि अभिनेत्यावर हल्ल्याचा कट असल्याचं सांगितलं जात आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबईहाय अलर्टदहशतवादी हल्लापॅराग्लाइडिंग