Join us

मुंबई पोलिसांनी साजरा केला एफआयआर दाखल करण्यासाठी आलेल्या तरुणाचा वाढदिवस, केक भरवून पाठवलं घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:37 AM

कधी गुन्हेगार, तर कधी बंदोबस्त यामुळे नेहमी धावपळ करत असणा-या मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा पहायला मिळला आहे. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केला.

ठळक मुद्देतक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केलासाकीनाका पोलीस ठाण्यातील ही घटना आहेमुंबई पोलिसांनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत

मुंबई - कधी गुन्हेगार, तर कधी बंदोबस्त यामुळे नेहमी धावपळ करत असणा-या मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा पहायला मिळला आहे. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केला. यानंतर त्याला केक भरवला आणि घरी पाठवलं. साकीनाका पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली असून, तरुणाला केक भरवत असतानाचे फोटोही शेअर केले आहेत. 

साकीनाका पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या या तरुणाला कदाचित आपल्याला हा एक वेगळा अनुभव मिळणार असल्याची कल्पनाही केली नसेल. आशिष असं या तरुणाचं नाव आहे. आशिष तक्रार करण्यासाठी साकीनाका पोलीस ठाण्यात पोहोचला होता. यावेळी पोलिसांनी आधी केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला, नंतर त्याला केक भरवला आणि सोबतच एफआयआरची कॉपीही दिली. मुंबई पोलिसांनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत.

 

झालं असं की, आशिष एफआयआर दाखल करण्यासाठी साकीनाका पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी तक्रार करत असताना पोलिसांनी त्याची वैयक्तिक माहिती विचारली. त्याने आपली जन्मतारीख सांगितली असता, आज त्याचा वाढदिवस असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्याचा वाढदिवस खास करण्याच्या हेतूने केक मागवला आणि पोलीस ठाण्यातच केक कापून वाढदिवस साजरा केला. 

मुंबई पोलिसांच्या या कृत्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे, तर काहीजणांनी मात्र खिल्ली उडवली आहे. पोलिसांनी आता ही सवय करुन घेऊ नये, नाहीतर लोक वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने एफआयआर दाखल करण्यासाठी येतील असा टोला काही ट्विटर युजर्सनी लगावला आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीसपोलीस ठाणेपोलिसट्विटर