मुंबईचे पोलिस आयुक्त अनुपस्थित राहिल्याने उपनगरसंदर्भातील बैठकीत खडाजंगी
By मनोहर कुंभेजकर | Published: July 12, 2023 06:21 PM2023-07-12T18:21:30+5:302023-07-12T18:22:46+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त व पालिका आयुक्त उपस्थित असावेत हे अधिवेशनात ठरलेले
मुंबई - मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज जोरदार खडाजंगी झाली. उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. वांद्रे (पूर्व ) चेतना कॉलेज मध्ये झालेल्या या बैठकीत मुंबईचे पोलिस आयुक्त उपस्थित नसल्याच्या मुद्यावरुन आमदार अनिल परब व आमदार अस्लम शेख आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त व पालिका आयुक्त उपस्थित असावेत हे अधिवेशनात ठरलेले असताना देखील बैठकीला हे दोन्ही आयुक्त बैठकीला उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरुन आमदार अँड.अनिल परब व आमदार अस्लम शेख यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये जुंपली. या दोन्ही आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे सदर बैठक रद्द करण्याची मागणी अँड.अनिल परब यांनी केलेली मागणी यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी फेटाळून लावली आणि पुढील कामकाज सुरच ठेवले.