Join us

‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फेरविचार, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 5:45 AM

मुंबईचे माजी आयुक्त संजय बर्वे यांनी निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फेरविचार करून निर्णय घेतला जाईल,

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त संजय बर्वे यांनी निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फेरविचार करून निर्णय घेतला जाईल, असे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांमध्ये त्यांनी त्या अधिकाºयांच्या बदल्यांबाबत निर्णय घेतला होता. आता त्या आदेशाला स्थगिती दिली आहे.निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक, गरजेशिवाय अधिकाºयांच्या बदल्या करू नयेत, असा संकेत आहे. मात्र, बर्वे यांनी २७ फेबु्रवारी रोजी शहर व उपनगरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या एकूण ३० अधिकाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या. त्यामध्ये प्रत्येकी ४ सहायक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश होता. त्याशिवाय सशस्त्र दलात कार्यरत १७ निरीक्षकांना विविध पोलीस ठाणे व शाखांमध्ये नियुक्ती दिली होती. मात्र, शनिवारी या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली.याबाबत आयुक्त परमबीर सिंग म्हणाले, या बदल्या कोणत्या उद्देशाने केल्या गेल्या, याबाबत माहिती घेतली जात आहे. त्याच्या आढाव्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. प्रशासकीय बाब असल्याने त्याबाबत सध्या अधिक बोलू शकत नाही.