मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या वाढीव मुदतवाढीची मुदत शनिवारी संपत असली तरी त्यांना दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने मंगळवारी तयार करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.राज्यातील सत्तांतरामुळे पोलीस दलात अनेक संदर्भ बदलणार आहेत. मात्र तूर्तास बर्वे यांना दुसºयांदा मुदतवाढ मिळण्यात या सत्तांतराचा कसलाही अडसर होणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या पदासाठी पूर्वीपासून चर्चेतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग व राज्य गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख रश्मी शुक्ला यांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल. महाविकास आघाडी सरकारमुळे या दोघांपेक्षा वरिष्ठ महाराष्टÑ पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 6:23 AM