मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात रजेच्या अर्जावरून पोलिसांमध्ये बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 02:57 AM2017-09-17T02:57:04+5:302017-09-17T02:57:16+5:30

रजेच्या अर्जावरून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये कार्यरत पोलीस अंमलदार आणि अधिका-यामध्ये शनिवारी बाचाबाची झाली. याच दरम्यान अंमलदार चक्कर येऊन कोसळले.

Mumbai police commissioner's office on the leave application, | मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात रजेच्या अर्जावरून पोलिसांमध्ये बाचाबाची

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात रजेच्या अर्जावरून पोलिसांमध्ये बाचाबाची

Next

मुंबई : रजेच्या अर्जावरून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये कार्यरत पोलीस अंमलदार आणि अधिका-यामध्ये शनिवारी बाचाबाची झाली. याच दरम्यान अंमलदार चक्कर येऊन कोसळले. त्यांच्यावर जी.टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तालयातील पत्रकार कक्षात अधिका-यासह सहा अंमलदार कार्यरत आहेत. घरगुती कारणासाठी अंमलदार राजेंद्र शेडगे (४५) यांनी रजेची मागणी केली होती. मात्र अन्य काही अंमलदार रजेवर गेले असल्याने अधिकारी समाधान चौधरी यांनी टाळाटाळ केल्याचे समजते. दोघांत बाचाबाची झाली. दरम्यान, शेडगे चक्कर येऊन कोसळले. त्यांना पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या वाहनातून जी. टी. रुग्णालयात नेले. बाचाबाचीसारखे काहीच घडले नसल्याचे करंदीकर म्हणाल्या.

Web Title: Mumbai police commissioner's office on the leave application,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस