मुंबई पोलीस ठरले हीरो! गणेशोत्सव निर्विघ्न, सलग ११ दिवस अहोरात्र बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 07:28 AM2017-09-13T07:28:45+5:302017-09-13T07:28:45+5:30

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यात मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. ४० हजार पोलिसांचा फौजफाटा, सोबत होमगार्ड व आठ हजार स्वयंसेवक १२ दिवस कार्यरत होते. विशेष म्हणजे परदेशी पर्यटक व भक्तांना टिष्ट्वटर, एसएमएसद्वारे संपर्क साधण्याची व्यवस्था केली होती. विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर ड्रोनचा वापर करण्यात आला होता.

Mumbai police constable Hero Ganesh Utsav continuous, consecutive 11 days day-night settlement | मुंबई पोलीस ठरले हीरो! गणेशोत्सव निर्विघ्न, सलग ११ दिवस अहोरात्र बंदोबस्त

मुंबई पोलीस ठरले हीरो! गणेशोत्सव निर्विघ्न, सलग ११ दिवस अहोरात्र बंदोबस्त

Next

- योगेश बिडवई 
मुंबई : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यात मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. ४० हजार पोलिसांचा फौजफाटा, सोबत होमगार्ड व आठ हजार स्वयंसेवक १२ दिवस कार्यरत होते. विशेष म्हणजे परदेशी पर्यटक व भक्तांना टिष्ट्वटर, एसएमएसद्वारे संपर्क साधण्याची व्यवस्था केली होती. विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर ड्रोनचा वापर करण्यात आला होता. एकंदर सर्व यंत्रणांमध्ये दिवसरात्र काम करणारे मुंबई पोलीसच हीरो ठरले.
पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई व सह पोलीस आयुक्त देवेन भारती (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बंदोबस्त कार्यरत होता. सुरक्षेसाठी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन, हॉटेल व लॉज चेकिंग झाली. महिलांचे छेडछाडीचे प्रकार रोखणे व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस कार्यरत होते. एस. जयकुमार (मध्य प्रादेशिक विभाग) यांच्या नेतृत्वात लालबागच्या राजासाठी एक कमांड सेंटर तयार केले होते. विसर्जनाच्या दिवशी वाहतूक शाखेतील ३६०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, ५०० ट्रॅफिक वॉर्डन व स्वयंसेवक कार्यरत होते. विसर्जनाच्या ११९ ठिकाणी प्रथमोपचार व नागरी सुविधा केंद्र आणि वॉच टॉवर उभारण्यात आले होते. जलतरणपटू, तटरक्षक दल व नौदलाच्या बोटी उपलब्ध होत्या. लहान मुले, वृद्ध नागरिक हरवण्याच्या काही घटनाही गणेशोत्सवात घडल्या. पोलिसांच्या तत्परतेने त्यांना नातेवाइकांकडे सोपवण्यात आले. उत्सवात २८० आजारी भक्तांना पोलिसांनी मदतीचा हात दिला. कुणाला तातडीने औषधे दिली तर काहींना अ‍ॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पोहोचविले.

40000
पोलीस अधिकारी-कर्मचारी

169
होमगार्ड

12
कंपन्या
राज्य राखीव पोलीस दल

8000
स्वयंसेवक

5000
सीसीटीव्ही

3600
वाहतूक शाखा
अधिकारी-
कर्मचारी

500
ट्रॅफिक
वॉर्डन

Web Title: Mumbai police constable Hero Ganesh Utsav continuous, consecutive 11 days day-night settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.