- योगेश बिडवई मुंबई : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यात मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. ४० हजार पोलिसांचा फौजफाटा, सोबत होमगार्ड व आठ हजार स्वयंसेवक १२ दिवस कार्यरत होते. विशेष म्हणजे परदेशी पर्यटक व भक्तांना टिष्ट्वटर, एसएमएसद्वारे संपर्क साधण्याची व्यवस्था केली होती. विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर ड्रोनचा वापर करण्यात आला होता. एकंदर सर्व यंत्रणांमध्ये दिवसरात्र काम करणारे मुंबई पोलीसच हीरो ठरले.पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई व सह पोलीस आयुक्त देवेन भारती (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बंदोबस्त कार्यरत होता. सुरक्षेसाठी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन, हॉटेल व लॉज चेकिंग झाली. महिलांचे छेडछाडीचे प्रकार रोखणे व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस कार्यरत होते. एस. जयकुमार (मध्य प्रादेशिक विभाग) यांच्या नेतृत्वात लालबागच्या राजासाठी एक कमांड सेंटर तयार केले होते. विसर्जनाच्या दिवशी वाहतूक शाखेतील ३६०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, ५०० ट्रॅफिक वॉर्डन व स्वयंसेवक कार्यरत होते. विसर्जनाच्या ११९ ठिकाणी प्रथमोपचार व नागरी सुविधा केंद्र आणि वॉच टॉवर उभारण्यात आले होते. जलतरणपटू, तटरक्षक दल व नौदलाच्या बोटी उपलब्ध होत्या. लहान मुले, वृद्ध नागरिक हरवण्याच्या काही घटनाही गणेशोत्सवात घडल्या. पोलिसांच्या तत्परतेने त्यांना नातेवाइकांकडे सोपवण्यात आले. उत्सवात २८० आजारी भक्तांना पोलिसांनी मदतीचा हात दिला. कुणाला तातडीने औषधे दिली तर काहींना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पोहोचविले.40000पोलीस अधिकारी-कर्मचारी169होमगार्ड12कंपन्याराज्य राखीव पोलीस दल8000स्वयंसेवक5000सीसीटीव्ही3600वाहतूक शाखाअधिकारी-कर्मचारी500ट्रॅफिकवॉर्डन
मुंबई पोलीस ठरले हीरो! गणेशोत्सव निर्विघ्न, सलग ११ दिवस अहोरात्र बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 7:28 AM