फटाके फोडणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक कारवाई
By मनीषा म्हात्रे | Published: November 13, 2023 06:34 PM2023-11-13T18:34:49+5:302023-11-13T18:35:02+5:30
बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये एकूण ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ७३४ इसमांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.दिवाळी सणामध्ये फटाक्यांमुळे मुंबई महानगर प्रदेशात वायु प्रदूषण वाढून हवेची गुणवत्ता खालावली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मा. उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका क्र. ०३ / २०२३ अन्वये याचिका दाखल करुन घेतली आहे. सदर याचिकेच्या दिनांक १० / ११ / २०२३ रोजीचे सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशामध्ये मा. उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या उपरोक्त निर्देशांची गांभीर्याने दखल घेवून मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस सह आयुक्त (का. व सु.) यांच्या देखरेखीखाली मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यामध्ये मा. उच्च न्यायालयाचे उपरोक्त निर्देशानुसार दैनंदिन कार्यवाही करण्यात येत आहे. दिनांक १०/११/२०२३ ते दिनांक १२ / ११ / २०२३ या दरम्यान फटाके उडविणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले असुन, त्यामध्ये एकूण ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ७३४ इसमांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदरची कार्यवाही ही यापुढे देखील सुरु राहणार आहे.