मुंबई पोलिसांनी उतरवली ३३३ वाहन चालकांची धुंदी; थर्टी फर्स्टच्या रात्री ९० लाखांची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:17 IST2025-01-02T09:16:37+5:302025-01-02T09:17:17+5:30

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ८०० चालकांना ई-चलन बजावून ८९ लाख १९ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.     

Mumbai Police Detoxification of 333 drivers; fines of Rs 90 lakh collected on the night of 31st | मुंबई पोलिसांनी उतरवली ३३३ वाहन चालकांची धुंदी; थर्टी फर्स्टच्या रात्री ९० लाखांची दंडवसुली

मुंबई पोलिसांनी उतरवली ३३३ वाहन चालकांची धुंदी; थर्टी फर्स्टच्या रात्री ९० लाखांची दंडवसुली

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३३३ वाहनचालकांवर मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळपर्यंत कारवाई केली. थर्टी फर्स्ट  निमित्ताने पोलिसांनी १०७ ठिकाणी नाकाबंदी करून ४६ हजार ८०० वाहनांची तपासणी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ८०० चालकांना ई-चलन बजावून ८९ लाख १९ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.     

मुंबईत मंगळवारी मध्यरात्री २ ते बुधवारी सकाळपर्यंत मुंबई पोलिस आणि वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. १०७ ठिकाणी नाकाबंदी करून ४६,१४३ वाहने तपासण्यात आली. यात मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये ५६७० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, तर ३३३ मद्यपी चालकांची धुंदी उतरवण्यात आली. वाहतूक विभागाने गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बॅण्डस्टॅण्ड, जुहू चौपाटीसह महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बडगा उगारला. 

अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मायानगरी मुंबईच्या रस्त्यांवर थर्टी फर्स्टच्या रात्री होणारी गर्दी लक्षात घेऊन १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या दिमतीला सशस्त्र दल, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथके, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, शीघ्रकृती दल आणि फोर्स वन या विशेष पथकांवर सुरक्षेची जबाबदारी होती. 

प्रकार    ई-चलान 
बेशिस्तपणे वाहन चालवणे    २८९३ 
विनाहेल्मेट    १९२३ 
भाडे नाकारणे    १९७६ 
सिग्नल मोडणे    १७३१ 
नो एंट्री    ८६८

प्रकार    ई-चलान 
भरधाव वेग    ८४२ 
विना सीटबेल्ट    ४३२ 
गणवेश न घालणे    २०० 
ट्रिपल सीट    १२३ 
ड्रंक अँड ड्राइव्ह    ३३३
 

Web Title: Mumbai Police Detoxification of 333 drivers; fines of Rs 90 lakh collected on the night of 31st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.