लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, राज्य पोलिस दलात निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या १४३ अधिकाऱ्यांना सहायक आयुक्त, उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यासोबत, सहायक आयुक्त, उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी, सहायक समादेशक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही जारी केले. यामध्ये मुंबईला ४९ एसीपी मिळाले आहे.
राज्यात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या राजू कसबे, संजय भालेराव, संजय मोकाशी, विजय बेलगे, प्रदीप खुडे, सुहास कांबळे, सुनील कांबळे, सुनील चंद्रमोरे, संजय डहाके, इनामदार सीराज हजरत मोहम्मद, चंद्रकांत काटकर, सोमेश्वर कामठे, अधिकराव पोळ, रवींद्र दळवी, सुनील काळे, शहाजी शिंदे, शशिकांत भंडारे, शाम शिंदे, अभिजित मोहिते, दत्तात्रय नाळे, शेखर डोंबे, योगेश गावडे, दीपक पालव, मनोहर शिंदे, महेश मुगुटराव, भूषण बेळणेकर, माया मोरे, कुमुद कदम, दाैलत साळवे आणि झुबेदा शेख यांची मुंबईत एसीपी म्हणून नेमणूक केली. निरीक्षक जगदीश साईल यांची राज्य दहशतवादविरोधी पथकात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
१६ एसीपी रिटर्न सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या १३९ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सहायक पोलिस आयुक्त असलेले विनायक वस्त, उपअधीक्षकपदी कार्यरत असलेले महेश देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र आगरकर आणि सहायक पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी हिरेमठ यांच्यासह एकूण १६ अधिकारी मुंबईत आले.