मुंबई पोलीस दलात फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:54+5:302021-01-13T04:14:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गृहमंत्रालयाने बढती देऊन बदली केलेल्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गृहमंत्रालयाने बढती देऊन बदली केलेल्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांना बढत्या देऊन नियुक्त्या देत, मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मंगळवाऱी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. यात एकूण १३२ जणांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाने गेल्या महिन्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्त्या दिल्या होत्या. बढती मिळून मुंबईबाहेर बदली झालेल्या २३ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर ४२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करत त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. तर ३९ पोलीस निरीक्षकांना बढती त्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर १२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सहायक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अविनाश शिंगटे यांची डोंगरी विभागात, डोंगरी विभागाचे अविनाश धर्माधिकारी यांची वाकोला विभागात, तर मुलुंड विभागाचे पांडुरंग शिंदे यांना कुलाबा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.