मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये; राऊतांच्या आरोपानंतर 'त्या' कंपन्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 09:15 AM2022-03-23T09:15:21+5:302022-03-23T09:15:38+5:30

पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू

mumbai police gave notice to companies after shiv sena mp sanjay raut alleges money laundering | मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये; राऊतांच्या आरोपानंतर 'त्या' कंपन्यांना नोटीस

मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये; राऊतांच्या आरोपानंतर 'त्या' कंपन्यांना नोटीस

Next

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईपाठोपाठ आता मुंबई पोलिसांनीही चौकशीचा वेग वाढवला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपावरून, आर्थिक गुन्हे शाखेने संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी व व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर काही कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी कंपन्यांना नोटीस बजावून याप्रकरणात अधिक माहिती देण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी तक्रारदार अरविंद भोसले यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. 

त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीला सुरुवात केली आहे. या तक्रारीत कंपन्यांची यादीही देण्यात आली होती. त्या कंपन्यांना नोटीस बजावून अधिक माहिती मागवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai police gave notice to companies after shiv sena mp sanjay raut alleges money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.